Gram Suraksha Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनेत मिळताहेत बंपर रिटर्न, रोज 50 रुपये बचत केल्यास 35 लाख मिळतात ‘रिटर्न’; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gram Suraksha Scheme | जेव्हा देशात इंटरनेट नव्हते, तेव्हा ई-मेलची सुविधा नव्हती. त्यावेळी पोस्ट ऑफिस (Post Office) संदेश पाठवण्याचे एकमेव साधन होते. आता हायटेक युग आले आहे. पोस्ट ऑफिसमधील गर्दी थोडी कमी झाली आहे. परंतु अजूनही पोस्ट ऑफिसच्या (Gram Suraksha Scheme) अनेक योजना आहेत, ज्या ग्राहकांचे लक्ष आकर्षीत करतात.

 

जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला रिटर्न हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत (Gram Suraksha Scheme) विना जोखिम चांगला नफा कमावता येऊ शकतो.
या योजनेत तुम्ही छोटी-छोटी रक्कम गुंतवूण मोठे पैसे जमवू शकता.

 

Gram Suraksha Scheme योजनेत नियमित गुंतवणुकीनंतर तुम्ही एकरकमी 35 लाख रुपये मिळवू शकता.
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेत चांगल्या रिटर्नसह लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) चा सुद्धा फायदा मिळतो. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

ग्राम सुरक्षा योजनेचे फायदे

 

19 ते 55 वर्ष वयोगटातील कुणीही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो.
किमान विमा रक्कम 10,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करू शकता.
प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक करू शकता.

 

प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी 30 दिवसांची सूट आहे. पॉलिसी कालावधीत प्रीमियम न भरल्यास बंद पडल्याच्या स्थितीत ग्राहक पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रलंबित प्रीमियमचे पेमेंट करू शकतो.
जर कुणी 19 वर्षाच्या वयात 10 लाखाची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली तर 55 वर्षासाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षासाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षासाठी 1,411 रुपये असेल.
पॉलिसी खरेदाराला 55 वर्षासाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षासाठी 33.40 लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल. 60 वर्षासाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये होईल.

 

3 वर्षानंतर सरेंडरचा पर्याय

 

ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. मात्र, अशावेळी कोणताही लाभ मिळणार नाही.
पॉलिसीचे सर्वात मोठे आकर्षण इंडिया पोस्टद्वारे दिला जाणारा बोनस आणि अंतिम घोषित बोनस प्रति वर्ष 65 रुपये प्रति 1,000 रुपये आहे.

 

Web Title : Gram Suraksha Scheme | post office saving scheme gram suraksha scheme return up to 35 lakh loan facilities

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik Daughter | ‘पेडलरची पत्नी म्हटले गेले, मुलांनी मित्र गमावले’, नवाब मलिकांच्या मुलीचे खुले पत्र

Khadakwasla Dam | पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 94.56 % पाणीसाठा

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग कशी लागली? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती; मुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश