Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसची बंपर स्कीम ! रोज 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 35 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) ही ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमाचा (Rural Postal Life Insurance Schemes Programme) एक भाग आहे. ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी 1995 मध्ये भारतातील ग्रामीण जनतेसाठी सुरू करण्यात आली.

 

तुम्ही ग्राम सुरक्षा योजनेसाठी दररोज फक्त 50 रुपये गुंतवल्यास, स्वत:साठी 35 लाख रुपयांचा रिटर्न सुनिश्चित करू शकता. म्हणजेच या योजनेत महिन्याला 1500 रुपये जमा केल्यास 35 लाख रुपये मिळू शकतात.

 

ग्राम सुरक्षा योजना म्हणजे काय?
ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करणार्‍याला पूर्ण 35 लाखांचा लाभ मिळतो. गुंतवणूकदाराला या योजनेची ही रक्कम 80 व्या वर्षी बोनससह मिळते. या योजनेत गुंतवणूक करणार्‍या व्यक्तीचा वयाच्या 80 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते. (Gram Suraksha Yojana)

 

19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणीही करू शकतो गुंतवणूक
19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो.
यामध्ये किमान 10,000 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.
यामध्ये प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्यायही दिले आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ता भरू शकतो.

 

चार वर्षांनी मिळते कर्ज
ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही कर्जाचा लाभही घेऊ शकता.
मात्र, पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनीच कर्ज घेता येते.
याशिवाय, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान एखाद्या वेळी प्रीमियम चुकला तर तुम्ही प्रलंबित प्रीमियम रक्कम भरून ती पुन्हा सुरू करू शकता.

 

Web Title :- Gram Suraksha Yojana | gram suraksha yojana post office scheme invest rs 50 per day to get 35 lakh rupees fund at maturity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Airtel 365 Days Plan | एक वर्षाच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतील अनलिमिटेड कॉल्स, जाणून घ्या किंमत

 

Pune Crime | तोतया अँटी करप्शनची रेड पोलिसांच्या दक्षतेने टळली; पोलिसांना पाहून बनावट पोलिसांनी ठोकली धुम

 

Cryptocurrency Market | क्रिप्टोकरन्सी मार्केट मागील 3 दिवसांपासून पॉझिटिव्ह, लागोपाठ वाढत आहे इथेरियमचा डॉमिनन्स