Grampanchayat Elections | अनेकांना ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज न भरता आल्यामुळे निवडणूक आयोग स्वीकारणार ऑफलाइन अर्ज; अर्ज भरण्याच्या वेळेतही वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची (GramPanchayat elections) घोषणा केली होती. केलेल्या घोषणेनुसार संगणक प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वा.) पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. मात्र, निवडणूक आयोगाचे संकेत स्थळ काम करत नसल्याने उमेदवारांचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचे (Grampanchayat Elections) अर्ज ऑफलाइन भरण्याची परवानगी दिली आहे.

तसेच, निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान (State Election Commissioner U.P.S. Madan) यांनी दिली आहे. आता नामनिर्देशपत्रात अंशत: दुरुस्ती करून पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील. अर्ज ऑफलाइन भरण्याची परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती.

निवडणूक आयोगाची वेबसाइट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
आतापर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीमागे फक्त 40 ते 50 उमेदवारांनी फॉर्म भरले होते.
त्यामुळे अनेकांना उमेदवारी अर्ज देणे शक्य झाले नाही हे समोर आले.
आता अर्ज ऑफलाइन देता येत असल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Web Title :- Grampanchayat Elections | grampanchayat election permission to fill gram-panchayat election forms offline information from state election commissioner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | माझ्यामुळे भाजपची अडचण होत असेल, तर… – उदयनराजे भोसले

Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; “मी घराबाहेर पडलोय, तर यांच्या पोटात…”