रोहयो अपहारप्रकरणी ग्रामसेवक पोलीस कोठडीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील रोजगार हमी योजनेतील कामात ६१ लाख ६५ हजार रुपये अपहाराच्या गुन्ह्यात अटक आरोपी सचिन बाळकृष्ण काळे यास सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पाथर्डी न्यायालयाने दिले आहेत.

सन २०१० ते १३ या कालावधीत पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंध अपंग तसेच उच्चभ्रू लोकांना मजूर दाखवून त्यांची नावे बनावट पोस्ट खाते उघडून त्यांच्या नावे बनावट आधार कार्ड तयार करून मजुरीचे पैसे हडप करून अभिलेख गहाळ केल्या प्रकरणी बाबा सानप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने मनसेचा जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर व ग्रामसेवक सचिन काळे यांच्या विरुद्ध ६१ लाख ६५ हजारांच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता.

याच गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेला आरोपी ग्रामसेवक सचिन काळे यास शेवगाव पोलिसांनी अटक केली असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी आरोपी काळे यास न्यायाधीश एस.एस.देशमुख यांच्या समोर हजर केले असता आरोपी सचिन काळे यास १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकार तर्फे वकील राहुल कोळेकर यांनी बाजू मांडली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/