‘त्या’ टेनिसपटूला चाहत्याचा सेल्फी पडला ‘महागात’

मियामी : वृत्तसंस्था – चाहते आपल्या आवडत्या सेलेब्रिटींना भेटण्यासाठी नेहमीच धडपडत असतात. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचाही मोह त्यांना आवरत नाही. कधीकधी एखादा चाहता काहीतरी डोकेदुखी करून ठेवतो. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका स्टार खेळाडूला चाहत्याच्या प्रतापाचा सामना करावा लागला आहे.

ही स्टार खेळाडू कॅनडाची सुपरस्टार टेनिसपटू जिनी बुचार्ड आहे. बुचार्ड जेवढी चांगली खेळते तेवढीच ती सुंदर आहे. जो किस्सा जिनीसोबत घडला तो लगेचच सोशलवर व्हायरल झाला. तिने एका चाहत्याचा सेल्फीचा हट्ट पूर्ण केला. या चाहत्यानं केलं असं की, या त्याने मियामीतील एका हॉटेल व्यवस्थापनाला सेल्फी दाखवला आणि तो जिनीचा भाऊ असल्याचं सांगितलं. तो दोन महिने हॉटेलमध्ये राहिला. या पंचतारांकित हॉटेलचं 63 हजार अमेरिकन डॉलरचं बिल त्याने जिनी बुचार्डच्या नावावर पाठवलं.

हा प्रकार लक्षात येताच जिनीनं तात्काळ पोलिसात धाव घेतली. मियामी पोलिसांना या चाहत्याला ताबडतोब अटक केली. सोलोमन श्लोमो अझारी असं या चाहत्याचं नाव आहे. आणखी एक बाब अशी की पोलिसांना त्याच्याजवळ कोकेनही सापडलं. दोन महिने त्याने हॉटलेच्या सोयी सुविधांचा लाभ घेतला होता.