जग फिरण्याच्या वेडापायी आजी-आजोबांनी विकले घर आणि मालमत्ता 

सिएटल : वृत्तसंस्था – प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण हक्काचे घर घ्यावे. यासाठी ते काय काय करतात. वारेमाप कष्ट घेतात. काहींचे तर तारुण्य जाते तेव्हा कुठे त्यांचे हक्काचे घर तयार होते. फिरण्याची हौस तर सर्वांनाच असते. परंतु घर विकून कोणी सफरीवर जात नाही. किंवा केवळ फिरण्यासाठी कोण घर विकले अशी तुम्ही एकही केस नक्कीची नसेल पाहिली. परंतु आता अशी घटना घडल्याचे समोर आले आहे.

तुम्ही जर उतार वयात असाल तर अशा वयात तुम्हाला डोक्यावर हक्काचे घर हवे असते. अशात कोणीच घर विकण्याचा विचारही करणार नाही. परंतु अशा वयातच अमेरिकेतील एका जोडप्याने जग फिरण्यासाठी घराबाहेर पडण्याचे ठरवले. आणि जग फिरण्याच्या या वेडापायी आपले घर विकले. शिवाय फक्त घरच नाही तर त्यांनी आपली इतर संपत्तीही विकल्याचे समजत आहे.  मायकल (वय 72) व डेबी (62) अशी त्यांची नावे आहेत.

सिएटल येथील एक उतार वयातील जोडपे होते. या जोडप्याने  निवृतीनंतर जग फिरायला सुरुवात केली. आता जग फिरायचे म्हटल्यावर रोजचा भरमसाठ खर्च लागणारच. मग हा खर्च भरून काढण्यासाठी या जोडप्याने घरदार विकले. यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांची बोट आणि इतरही  संपत्ती विकली. या हौशी जोडप्याने 2013 साली आपली ही जगभ्रमंती सुरू केली.

जगभ्रमंती करत असलेल्या या जोडप्याने आतापर्यंत 250 शहरांना भेट दिली आहे. आपली सगळी संपत्ती विकल्यानंतर आता  हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने मायकल आणि डेबी एअरबीएनबीच्या माध्यमाने एखाद्या कुटुंबाच्या घरात जाऊन राहतात. यामुळे त्या देशातील संस्कृती जवळून बघता येते, असे मायकलचे म्हणणे आहे. एका दिवसासाठी हे जोडपे त्या कुटुंबाला साडेसहा हजार रुपये देतात.  ज्या देशात ते जातात तेच आपले घर आहे, असे ते सांगतात. इतेकच नाही तर ब्लॉग लिहून ते आपले पर्यटनातील अनुभव शेअर करीत असतात.