संतापजनक ! आजोबाचा 6 वर्षीय नातीवर बलात्कार; 3 वर्षीय नातवाला 20 रुपये देऊन केलं गप्प

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एका नराधमाने आपल्या मित्रासह स्वतःच्या 6 वर्षांच्या नातीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर त्याने 3 वर्षीय नातवाला 20 रूपये देऊन गप्प बसवले आहे. आठ दिवसापूर्वी मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळच्या कोलार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दोन्ही मुलांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी (दि.8) ही घटना उघडकीस आली. प्राथमिक तपासणीत असे आढळले आहे की, संजय नावाच्या व्यक्तीने दोन्ही मुलांना आपल्या घरी नेले आणि तेथेच मुलावर बलात्कार केला. थोड्या वेळाने मुलीचे आजोबाही तिथे आले आणि त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना कोणत्या दिवशी घडली, नक्की काय झाले याबाबत सांगण्याची मुलांची मनस्थिती नव्हती. आरोपींनी मुलांना 20 रुपये दिले आणि याविषयी कोणालाही सांगू नका असे त्यांच्याकडून बजावून घेतले. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा खूप गंभीर असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.