Bhosari News : भांडण झालेल्या मुलीसोबत नात खेळायला जात होती अन् चिडलेल्या आजीने…

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पूर्वी भांडण झालेल्या मुलीसोबत नात नेहमी खेळायला जात होती. त्यामुळे संतापलेल्या 70 वर्षीय महिलेने 9 वर्षाच्या मुलीला गरम झाऱ्याने चटके देऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना भोसरी येथील विठ्ठलनगर येथे घडली आहे. ही घटना 30 डिसेंबर 2020 रोजी दुपारी बाराच्या सुमारास ठिठ्ठलनगर झोपडपट्टी येथे घडली.

प्राची उर्फ जान्हवी गायकवाड (वय-9) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. तर जडिता विश्वनाथ वाघमारे (वय-70 रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सारिका प्रदीप गायकवाड (वय-33 रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जडिता ही फिर्यादी सारिका यांची मावशी आहे. सारिका यांची मुलगी प्राची ही तिची मैत्रीण तनिष्का सोबत खेळायला जात होती. तनिष्का सोबत आरोपी महिलेचे भांडण झाले होते. तिच्या सोबोत प्राचीने खेळणे त्यांना आवडत नव्हते. प्राची तनिष्कासोबत खेळालयाला जात असल्याने तिचा राग येत होता. 30 डिसेंबर रोजी प्राची तनिष्का सोबत खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी संतापलेल्या जडिता यांनी तीला धरून घरात आणले. त्यानंतर गॅसवर झारा गरम करुन प्राचीच्या पायाला, हाताला, तोंडाला आणि गलाला चटके देऊन जखमी केले. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.