आजी -आजोबांचा ‘बॉल डान्स’ सोशल मीडियावर लोकप्रिय 

भोपाळमधील संजीव श्रीवास्तव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर एका आजी-आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांचा डान्स पाहणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध होत आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’745f800d-a2a1-11e8-9adf-d70e1f62de0a’]

साधासुधा नव्हे तर ‘बॉल डान्स’ या आजी-आजोबांनी केला आहे. एका पार्टीमध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ फेसबुकवर कर्नाटक येथील आदर्श हेगडे यांनी पोस्ट केला आहे. पारंपारिक पेहरावात आजी-आजोबा दिसत आहेत. आजी-आजोबा केनी लॉगिंस यांच्या क्‍लासिकल गाण्यावर ‘बॉल डान्स’ करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत १६ लाख लोकांनी पाहिला आहे तर २७ हजारपेक्षा आधिक जणांनी शेअर केला आहे.