30 जूनपूर्वी निवृत्त कर्मचार्‍यांची Gratuity वाढून येणार, 1 लाखावरून 7 लाख रुपयांचा होईल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gratuity | Indian Railways आणि दुसर्‍या केंद्रीय उद्योगातील (CPSEs) कर्मचार्‍यांना मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने या उद्योगातून जानेवारी 2020 पासून जून 2021 च्या दरम्यान निवृत्त लोकांसाठी मोठी लाभाची बाब आहे. सरकार या निवृत्त कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 11 टक्केच्या वाढीचा फायदा देण्यास तयार झाले आहे. यातून ज्यूनियर ते सिनियर लेव्हलच्या कर्मचार्‍यांना निवृत्ती फंडात सुमारे 1 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा होईल. हा फायदा Gratuity आणि Leave Encashment च्या प्रमाणे होईल.

Indian Railways चे Pay Commission VII आणि HRMS चे डेप्युटी डायरेक्टर जय कुमार यांच्यानुसार केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचार्‍यांच्या अगोदरच महागाई भत्त्यात (DA)
वाढीचा फायदा दिला गेला आहे. आता उर्वरित विभागाच्या लोकांना याचा फायदा दिला जात आहे.
या अंतर्गत रेल्वेच्या सर्व झोनचे निवृत्त कर्मचारी येतील.

40 हजार बेसिकवर 1 लाखापेक्षा जास्तीचा फायदा

DA चे कॅलक्युलेशन करणार्‍या एजी ऑफिस ब्रदरहुड, प्रयागराजचे माजी अध्यक्ष एच.एस. तिवारी यांनी सांगितले की,
जर एखाद्या कर्मचार्‍याची Basic Salary निवृत्तीवेळी 40 हजार रुपये असेल तर त्यांना महागाई भत्त्यात 11 टक्के वाढीने मोठा फायदा होईल.

त्यांच्या Gratuity आणि Leave Encashment च्या रक्कमेत सुमारे 117000 रुपये वाढीव मिळतील.
तर बेसिक पे 250000 रुपये महिना असेल तर निवृत्ती फंडात 7 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढ होईल.

 

कुणाला किती होईल फायदा

एचएस तिवारी यांनी सांगितले की, सरकारने ठरवले आहे की, 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2020 च्या दरम्यान निवृत्त लोकांना 21 टक्के DA च्या हिशेबाने Gratuity आणि Leave Encashment मिळेल.
तर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2020 ला निवृत्त लोकांना 24 टक्के आणि 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 च्या दरम्यान निवृत्त लोकांचा 28 टक्केच्या हिशेबाने निवृत्ती फंड होईल.

28 टक्के महागाई भत्त्याने पेमेंट

तिवारी यांनी म्हटले, जे कर्मचारी 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 च्या दरम्यान निवृत्त झाले आहेत, त्यांना मोठा फायदा होईल.
कारण त्यांच्या रिटायर्डमेंट फंडचे कॅलक्युलेशन 28 टक्के महागाई भत्त्याच्या आधारावर होईल.
यानंतर जे जुलै-डिसेंबर 2020 मध्ये निवृत्त झाले आहेत, त्यांना कमी फायदा होईल.
कारण त्या दरम्यान डीए 24 टक्के होता. तर जानेवारी-जून 2020 मध्ये निवृत्त होणार्‍यांना 21 टक्के डीएचा फायदा होईल.

 

पहा कॅलक्युलेशन (1 जानेवारी 2020-30 जून 2021 मध्ये निवृत्त होणारे लोक)

Basic Salary = 40000 रुपये महिना

दिड वर्षात 11 टक्के DA Hike = 4400 रुपये महिना

Basic + DA = 44400 रुपये महिना

Gratuity+Leave Encashment मध्ये फायदा = सुमारे 1,16,600 रुपये

 

Web Title : Gratuity | 7th pay commission gratuity news gratuity calculator revised rates of dearness allowance for employees retired during the period from january 2020 to june 2021 calculation of gratuity and cash payment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | ‘स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्यांना जनतेचा आवाजच ऐकू येत नाही’

Varsha Gaikwad | शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ! पालकांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; सूचनांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा; म्हणाले – ‘पुणे-सातारा महामार्गावरील टोल रद्द करणार’ (व्हिडीओ)