Gravittus Foundation | ‘ग्रॅव्हिटस फाउंडेशन’द्वारे ट्रान्सजेंडर्ससाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम; देशातील पहिला प्रकल्प पुण्यात सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे येथील ग्रॅव्हिटस फाउंडेशनद्वारे (Gravittus Foundation, Pune) तृतीयपंथीयांसाठी ‘प्रिझम’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रथमच तृतीयपंथियांसाठी रोजगार प्रशिक्षण कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. या कोर्सेसचे उद्घाटन शनिवारी तृतीयपंथी समाजाच्या कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या हस्ते झाले. तृतीय पंथियांसाठी रोजगार प्रशिक्षण देणारा देशातील हा पहिलाच उपक्रम (Gravittus Foundation, Pune) आहे.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (Symbiosis Skills and Professional University) याठिकाणी हे कोर्सेस घेण्यात येणार आहे. उद्घाटन प्रसंगी, त्रिपाठी म्हणाल्या, “तृतीयपथीयांना रोजगाररक्षम बनण्यासाठी खऱ्या अर्थाने अश्या रोजगारभिमुख प्रशिक्षणाची गरज आहे ज्यामुळे हा समाज घटक स्वावलंबी होईल.”

लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Laxmi Narayan Tripathi, transgender activist) म्हणाल्या, “असा विचारशील उपक्रम सुरू केल्याबद्दल ग्रॅव्हिटस फाउंडेशनची मी खूप आभारी आहे. मी या प्रकल्पाच्या भव्य यशासाठी शुभेच्छा देतो.”

ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या (Gravittus Foundation) संस्थपिका उषा काकडे (Usha Kakde) म्हणाल्या, “ट्रान्सजेंडर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पात टेलरिंग, सॅनिटरी पॅड मेकिंग, ब्युटी सर्व्हिसेस, हर्बल प्रॉडक्ट्स इत्यादी सर्टिफिकेशन प्रोग्रॅमचा समावेश आहे. प्रिझम हा प्रकल्प वंचित गटांना सन्माननीय उपजीविका प्रदान करण्याच्या नक्की मदत करतील.”

उषा काकडे पुढे म्हणाल्या, “मला असा विश्वास आहे की समाज बळकट व सबल करण्यासाठी सकारात्मक सामाजिक बदल गरजेचे आहेत. ग्रॅव्हिटस फाउंडेशन शिक्षणाच्या विविध शाखांमधील शिक्षण, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. ट्रान्सजेंडर समुदायास यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी कौशल्याभिमुख अभ्यासक्रम देण्याचा या प्रकारचा प्रिझम हा भारतातीत हा प्रथम उपक्रम असेल.”

उषा काकडे पुढे म्हणाल्या की प्रत्येक व्यक्तीला सन्माननीय जीवन जगण्याचा अधिकार आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे.
आमचा प्रयत्न हा आहे की आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकू आणि त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यात व आदराने आयुष्य जगण्यास मदत करू.
यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे आणि विद्यार्थ्यांद्वारे उत्पादित उत्पादने खरेदी करण्यासाठी रुग्णालयाशी करार केला आहे.
हे उपक्रम त्यांना पहिल्या दिवसापासून कार्य सुरू करण्यास,
आत्मनिर्भर होण्यास आणि सन्माननीय जीवन जगण्यासाठी मदत करतील.
आम्ही लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचे आभार मानू इच्छितो त्यांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मदत केली.
त्यांनी समाजासाठी खूप काम केले आहे.

डॉ. स्वाती मुजुमदार (dr swati mujumdar), प्रो-चांसलर सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने सर्वसमावेशक शिक्षणाच्या गरजेवर भर दिला आणि सांगितले की,
भारतात प्रथमच एक स्किल युनिवर्सीटी ट्रान्सजेंडर ग्रॅव्हिटस फाउंडेशन समुदायासाठी विशेष प्रकारे डिझाइन केलेले प्रोग्रॅम घेऊन आली आहे.
विद्यार्थ्यांनी तयार केलेली उत्पादने खरेदी करण्यासाठी उद्योगांचे सहकार्य घेऊन उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक अद्वितीय मॉडेल तयार केले आहे.
आम्हाला आनंद आहे की आम्ही समाजासाठी काहीतरी करू शकलो आणि समाजाच्या सर्वसमावेशक वाढीसाठी योगदान दिले.
या उपक्रमाद्वारे घेणार येणाऱ्या कोर्सेसचा सर्व खर्च ग्रॅव्हिटस फाउंडेशन ने घेतला आहे.

Web Titel :- Gravittus Foundation | Gravittus Foundation launched skill development program for transgender community

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cantonment | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची मोठी कारवाई ! पुलगेट परिसरातील दिल्ली दरबार, सुजाता मस्तानी, शेगाव कचोरी ‘सील’ बंद, जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Political News | देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास, नव्या समीकरणांचे संकेत?

Mumbai Crime | माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! 11 वर्षीय मुलीवर सोसायटीच्या वॉचमनकडून लैंगिक अत्याचार