Gravittus Foundation | तृतीयपंथीयांच्या मदतीसाठी उषा काकडे यांच्या ‘ग्रॅविटस’ संस्थेचा पुढाकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Gravittus Foundation | सामाजिक कार्यासाठी नेहमीच उत्स्फूर्तपणे भाग घेणारी पुण्यातील ग्रॅविटस फौंडेशन ही स्वयंसेवी संस्था आता तृतीयपंथीयांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. या संस्थेमार्फत या समाज घटकाच्या प्रगती साठी नवनवीन उपक्रम राबविणार आहे. सोमवारी सकाळी ग्रॅविटस फौंडेशनच्या (Gravittus Foundation) वतीने तृतीयपंथीयांना धान्य वाटप (Pune News) करण्यात आले.

तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक मंजुरी ला तीन वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्ताने हे धान्य वाटप करण्यात आले. ग्रॅविटस फौंडेशनच्या संस्थपिका उषा काकडे (gravittus foundation usha kakade) यांच्याहस्ते ह्या किट चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी काकडे यांनी उपस्थित तृतीयपंथीयांबरोबर संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतला. याविषयी बोलताना काकडे म्हणाल्या, “सर्वच समाजघटकांचा सामाजिक स्तर उंचावत असताना या प्रक्रियेत कायमच दुर्लक्षित राहिलेल्या गेलेल्या तृतीयपंथी घटकाला समाजात सन्मानाचे जीवन जगण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. त्यांची समाजातील ओळख नव्याने करून देण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ त्यांना ग्रॅविटस फौंडेशनच्या भविष्यात काही उपक्रम हाती घेणार आहे, त्या निमित्ताने कार्यालयात आज (सोमवार दि 6 सप्टेंबर) आमंत्रित करण्यात आले होते.”

 

 

काकडे पुढे म्हणाल्या, “तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहे.
करोना काळातील लॉकडाउनमुळे तर या समाज घटकाला खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.”

उपस्थित तृतीयपंथी कार्यकर्ती सोनाली दळवी म्हणाल्या, “सर्वोच्च न्यायालयाने ३७७ कलम रद्द केले असले
तरी कायद्यातील तरतुदी पेक्षा आम्हाला समाजाने स्वीकारणे जास्त गरजेचे आहे.
अजून खूप काही गोष्टी करणे गरजेजे आहे. नव्या पिढीने तर स्वावलंबी कसे होता येईल याकडे लक्ष द्यावे.”

याबाबत मत व्यक्त करताना दळवी पुढे म्हणाल्या की, तृतीयपंथी म्हणाले की देशातील तृतीयपंथीयांना सामाजिक समता मिळून त्यांचे,
आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण होण्याचा मार्ग जरी तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयकाने मोकळा झाला असला तरी समाजाकडून होणारा त्यांचा उपहास,
अवहेलना थांबण्यासाठी प्रयत्न होणे गरजेजे आहे.
उपजीविकेचे साधने कसे उपलब्ध होऊ शकतील याबाबत आम्ही उषा काकडे यांच्या बरोबर चर्चा केली.

Web Title : Gravittus Foundation | Usha Kakade’s ‘Gravitus’ initiative to help third parties

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update