कमी वयातच पांढऱ्या केसांनी ‘हैराण’ आहात ? घरच्या घरीच करा ‘हे’ 4 सोपे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर कमी वयातच तुमचे केस पांढरे झाले असतील तर अजिाबत हैराण होऊ नका. आज यासाठी आपण काही घरगुती आणि सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

1) पौष्टीक आहार – तुम्ही केसांना जेव्हा काही लावता तेव्हा त्याचा योग्य फायदा मिळवायचा असेल तर यासाठी तुमचा आहारही चांगला असायला हवा. त्यामुळं संतुलित आहार घेतला तर तुमचा अर्धा त्रास कमी होईल.

2) कांद्याचा रस – कांद्याचे काही तुकडे बारीक करून घ्या. आता याला ठेचून याचा रस काढा. हा रस डोक्याच्या त्वचेला लावून मसाज करा. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय केला तरीही तुम्हाला फायदा दिसेल.

3) तेल लावा – केस चांगेल राहण्यासाठी नियमित तेलही लावायला हवं. तुम्ही खोबरेल किंवा बदामाचं तेल लावू शकता. दोन्ही तेलांना एकत्र करून तेही तेल तुम्ही लावू शकता. यानं जास्त फायदा मिळतो.

4) आवळा आणि जास्वंदीची फुले – जर केस जास्त पांढरे झाले असतील तर या उपायाचा तुम्हाला खूप फायदा होईल. आवळा आणि जास्वंदीची फुले तसेच तिळाचं तेल यांची पोस्ट तयार करा. यात काही थेंब खोबरेल तेल टाकून यानं डोक्याच्या त्वचेची मसाज करा.