मोठी कारवाई ! पिंपरी-चिंचवड शहरातून एकाच दिवशी 9 गुन्हेगार ‘तडीपार’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धरपकड, प्रतिबंधात्मक कारवाई सुरु झाली आहे. परिमंडळ दोनच्या हद्दीतील नऊ सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी जिल्ह्यातून सहा महिने ते दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असल्याचे आदेश पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी काढले आहेत.
यामध्ये हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच, देहूरोडच्या हद्दीतील तीन आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असे नऊ जणांना तडीपार करण्यात आले आहे.

सांगवीच्या हद्दीतील बरकत उर्फ लल्या महंमद जमादार (२२, रा. जवळकरनगर, सांगवी) याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. देहूरोडच्या हद्दीतील लखन उर्फ निखील बाबू आगळे (३०, रा. देहूरोड), आमीन जिंदावली पठाण, खान (२०, रा. देहूरोड), डब्बू उर्फ हूसेन यासीन शेख (२५, रा. देहूरोड) या तिघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

हिंजवडी पोलिसांनी रविंद्र शिवाजी हांगे (२६, रा. गणेशनगर, थेरगाव), विकास अनिल वेताळ (२०, पारखे वस्ती, हिंजवडी), अनिकेत भाऊसाहेब पवार (२२, रा. चिंतामणी चौक, चिंचवड), मुकेश विटकर (२०, रा. वाकड) आणि नितीन रामभाऊ आवताडे (३२, रा.जगतापनगर, थेरगाव) या पाच जणांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले असल्याचे आदेश १० डिसेंबर रोजी उपायुक्त ढाकणे यांनी काढले आहेत.

एकाच दिवशी नऊ सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांची आणि कारवाईची दहशत निर्माण झाली आहे. शहर शांत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/