घर खरेदी करणार्‍यांसाठी मोठा ‘दिलासा’ ! मुद्रांक शुल्कात 1% ‘सवलत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत देण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये ही सवलत लागू होणार आहे.

या तीन शहरात घर खरेदी करणार्‍यांना सरकारने दिलासा दिला आहे. अजित पवार यांच्या या घोषणेने बांधकाम व्यावसायिकांकडून स्वागत करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील अन्य मोठ्या शहरांचाही यात समावेश करावा, अशी मागणी ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर अशा मोठ्या शहरातून होण्याची शक्यता आहे.