Lockdown : भारतीय रेल्वेची ‘लॉकडाऊन’ काळात मोलाची ‘कामगिरी’

मुंबई, पोलिसनामा ऑनलाईन – संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात असताना भारतीय रेल्वेने मात्र या काळात लाख मोलाची कामगिरी केली. लोकडाऊन च्या काळात भारतीय मध्य रेल्वेने १ हजार ४१५ मालगाड्यांमध्ये ७० हजार ३७४ वॉगण इतकी माल वाहतूक केली.

मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग आणि अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे ७५ रॅक मालगाड्यांद्वारे वाहतूक केली जात आहे . या मालगाडयांमध्ये अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंट तसेच अत्यावश्यक गोष्टींची वाहतूक सद्य स्थितीत केली जात आहे. . . सतत कार्यरत असलेल्या गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचारी हि मोलाची कामगिरी करीत आहे. मध्य रेल्वेने २१ एप्रिलपर्यंत २ हजार टनाहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली . ज्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, ज्यूट बियाणे, टपाल पिशव्या आणि कच्चा माल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची समावेश आहे .

मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात २५२ वॅगनमध्ये धान्य, तसेच ८८४ वॅगनमध्ये साखर, ३४ हजार ४९७ वॅगनमध्ये कोळसा, २५ हजार ३८० वॅगन्समध्ये कंटेनर, आणि ५ हजार १८३ वॅगन्समध्ये पेट्रोलियम उत्पादने, तसेच १हजार ८०२ वॅगनमध्ये खते, ६३५ स्टील, २५२ वॅगन्समध्ये डि-ऑईल केक आणि ११७ वॅगनमध्ये सिमेंट आणि १ हजार ७७२ वॅगनमध्ये विविध वस्तू भरून वाहतूक केली गेली . त्यामुळेच या लॉकडाऊन मध्ये भारतीय रेल्वे सेवेची हि कामगिरी लॉकडाऊन सुसह्य आणि सोप्प करणारी ठरली . तसेच सुमारे २२० पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार चालवल्या जात आहेत त्यामध्ये औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग इत्यादी आवश्यक वस्तू देशभरात पाठवल्या जात आहेत. देशात चाललेल्या कोरोनासारख्या युद्धजन्य परिस्तिथीत भारतीय रेल्वेचे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.