मोदी सरकारकडून लष्करी जवानांसाठी मोठी भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीमेवर शहीद झालेल्या किंवा युद्धात 60 % पेक्षा जास्त अपंगत्व असणार्‍या सैनिकांसाठी केंद्र सरकारने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. या सैनिकाच्या कुटुंबियांना मिळणारी नुकसान भरपाई 4 पटींनी वाढवण्यात आली आहे.

सैनिक देशाचे संरक्षण करण्यासाठी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यासाठी ते आपल्या घरापासून व कुटुंबापासून दूर राहतात. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक मदतीत वाढ करण्यात आली आहे.

सीमेवर शहीद झालेल्या किंवा युद्धात 60% पेक्षा जास्त अपंगत्व असणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांना मिळणारी नुकसान भरपाई 4 पटींनी वाढवण्यात आली आहे.