कॉमेंट्रीसाठी हिंदी शिकत होता ‘हा’ महान भारतीय खेळाडू, आता झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटमध्ये एकेकाळी इंग्रजीची क्रेझ होती, परंतु आता हिंदीने त्यास मागे टाकले आहे. याचा परिणाम कॉमेंट्रीमध्ये दिसू लागेला आहे आणि बहुतांश मोठे क्रिकेटर हिंदीत कॉमेंट्री करू लागलेत. दक्षिण भारतातून येणार्‍या व्हीव्हीएस लक्ष्मण सारखे क्रिकेटर तर हिंदी शिकण्यासाठी टयूशन सुद्धा लावत आहेत.

स्टार आणि डिज्नी इंडिया (क्रीडा) चे प्रमुख संजोग गुप्ता यांनी म्हटले की, प्रेक्षक नव्हे तर प्रसारक आणि कॉमेंटेटर सुद्धा नऊ तारखेपासून सुरू होणार्‍या आयपीएलसाठी खुप खुश आहेत. त्यांनी म्हटले की, हिंदी आज क्रिकेटचा सर्वात मोठा बाजार आहे. आयपीएल 2020 एकुण जेवढ्या प्रेक्षकांनी पाहिले त्यामध्ये दोन तृतीयांश हिंदी प्रेक्षक होते. अगोदर टीव्हीवर क्रिकेटची भाषा इंग्लिश होती, परंतु आता पूर्ण उलटे झाले आहे. आता जास्तीत जास्त लोक हिंदी भाषेत क्रिकेट पहात आहेत.

संजोग यांनी म्हटले की, तुम्ही पाहिले असेल की, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, राहुल द्रविड़, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गजांनी हिंदीत प्रयत्न केला आहे. आज कोणताही मोठी माजी भारतीय क्रिकेटर असो, त्याची हिंदीत कॉमेंट्री करण्याची इच्छा असते. हैद्राबादहून येणार्‍या व्हीव्हीएस लक्ष्मणची हिंदी खुप चांगली नव्हती, परंतु त्याला माहित होते की, प्रेक्षक हिंदी आहेत, यासाठी त्याने आपले हिंदी सुधारण्याचा प्रयत्न केला.

तुम्हाला खरे वाटणार नाही पण सुमारे एक वर्षभर व्हीव्हीएस लक्ष्मण दर आठवड्याला दोन किंवा तीन दिवस ट्यूशनमध्ये हिंदी शिकत होता आणि त्याने आपली हिंदी भाषा चांगली केली. आजही तो आपली हिंदी चांगली करण्याचा प्रयत्न करत असतो. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हिंदी प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. संजोग यांनी सांगितले की, आम्ही तंत्रज्ञानावर काम करत आहोत. पुढील 12 महिन्यात आपण पहाल की, रिप्ले आणि त्या आधारावर घेण्यात येणार्‍या निर्णयात सुधारणा होईल. चांगल्या तंत्रज्ञानाच्या वापराने अंपायर्सला मदत होईल आणि निर्णय अचूक येऊ लागतील.