‘IBM’मध्ये नोकर कपात, तब्बल एक लाख जणांचा नोकरीवरून काढलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स (आयबीएम) या कंपनीने वयोमानाच्या दृष्टीने भेदभाव करत मागील काही वर्षांत जवळपास १ लाख कामगारांना कमी करण्यात आल्याचा आरोप एका माजी कर्मचाऱ्याने कोर्टात सुनावणीवेळी केला. कंपनीला आधुनिक करण्यासाठी आणि बाजारपेठेत वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे या साक्षीदाराने म्हटले आहे.

कंपनीतील एका जुन्या विक्री प्रतिनिधीने या प्रकरणी कंपनीवर एक दावा दाखल केला आहे. या दाव्यावरील सुनावणीवेळी त्याने हि साक्ष दिली. त्यानंतर कंपनीचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅलन वाईल्ड यांनी वयोमानवरून केलेल्या भेदभावाचा आरोप फेटाळून लावताना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे मात्र स्वीकारले. कंपनीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि तरुणांची भरती करून कंपनीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले. या विक्री प्रतिनिधीबरोबरच ६१ वर्षीय जॉनाथन लँगली यांनी देखील आपल्याला वयोमानामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा आरोप करत कंपनीवर दावा दाखल केला आहे. एका अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षात कंपनीने ४० वर्षांपुढील जवळपास २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील आयबीएम कंपनीविरुद्ध मॅनहटन, कॅलिफोर्निया, पेन्सल्व्हेनिया, टेक्साससह अन्य शहरांतही अनेक दावे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या कंपनीविरुद्ध कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –