“एकपात्री नाटक सादर करणाऱ्यांना प्रचंड संधी” -प्रा. मिलिंद जोशी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

ताणतणावांच्या युगात लोकांना विरंगुळ्याची गरज असून यासाठी एकपात्री नाटक प्रभावी ठरू शकते, त्यामुळे उत्तम कलाकारांना प्रचंड संधी आहे. साहित्य, नाट्य आणि वक्तृत्वाची साधना करुन, दर्जेदार एकपात्री प्रयोग केला तर प्रसिद्धी, संपत्ती आणि मानसन्मान आपोआप मिळत जाईल”. अशी ग्वाही प्रसिद्ध लेखक, वक्ते आणि म.सा.प. चे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी दिली.

ख्यातनाम एकपात्रीकार पु.ल. देशपांडे यांच्या होणार्‍या जन्म शताब्दीच्या अनुषंगाने, आम्ही एकपात्री महाराष्ट्र संस्थेच्या वतीने, एकपात्री प्रयोग कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
[amazon_link asins=’B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6fbe7b4-8834-11e8-853c-39690910a455′]

विनोदबुद्धी, निरीक्षणशक्ती आणि वाचन यांच्या बळावर सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर कितीही स्पर्धा असली तरी गुणवत्ताच जिंकते. आणि आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे जेष्ठ कलाकार बंडा जोशी, वंदन राम नगरकर आणि संतोष चोरडिया हे स्वत: फुलताना, इतरांना फुलवण्यासाठी अशी कार्यशाळा घेत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. असंही प्रा.जोशी म्हणाले.

या कार्यशाळेसाठी बेळगाव, परभणी अशा विविध शहरातून २० प्रशिक्षणार्थी आले होते. या कार्यशाळेत, एकपात्री प्रयोगाची संहिता-लेखन, संपादन, सादरीकरण, अभिनय, देहबोली, वक्तृत्व या विषयी तपशीलवार मार्गदर्शन देऊन, प्रात्यक्षिके घेण्यात आली. या कार्यशाळेतून ‘आम्ही अधिक समृद्ध झालो आणि आम्हाला आत्मविश्वास आला’ असे प्रशिक्षणार्थींनी आवर्जून सांगितले. भविष्यात अशा कार्यशाळा राज्यात ठिकठिकाणी घेण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष. श्री. वंदन राम नगरकर यांनी प्रकट केला. शिल्पा देशपांडे यांनी उद्घाटन सोहळ्याचे सुत्रसंचालन केले. तर डाॅ. कविता घिया यांनी आभार प्रदर्शन केले.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc51dee4-8834-11e8-9c34-89c27a2ca7c4′]