पोस्ट ऑफीसची भन्नाट ‘स्कीम’ ! पती अन् पत्नीनं अकाऊंट उघडल्यास प्रत्येक महिन्याला मिळणार ‘दुप्पट’ फायदा, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 1 सप्टेंबर : मागील 5 महिन्यांपासून देशासह राज्यभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात छोट्यांपासून मोठ्यांपर्यत सर्वच उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचण अधिक प्रमाणात भासत आहे. सध्याच्या काळात नोकरीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांवर केवळ घर खर्च चालू शकत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे लोक पैसे मिळवण्यासाठी धडपडत करत आहेत. तसेच उपलब्ध असलेल्या पैशांची गुंतवणूक कशी करता येईल?, याचा अधिक विचार करत आहे. यासाठी पोस्ट ऑफिसने दाम्पत्यासाठी एक योजना आणली आहे.

भारतीय टपाल कार्यालयात देखील एक चांगली योजना उपलब्ध आहे. यात तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो. तसेच पती- पत्नीने संयुक्त खाते उघडल्यास या योजनेचा अधिक लाभ तुम्हाला मिळू शकतो.

टपाल कार्यालयाच्या या योजनेचे नाव ’मासिक उत्पन्न योजना’ असे आहे. या मार्फत प्रत्येक महिन्याला कमाई करण्याची संधी प्राप्त होईल. मासिक उत्पन्न योजनेमध्ये वैयक्तिक किंवा संयुक्त अशा दोन्ही पद्धतीने पोस्टात खाती उघडता येतात.

या योजनेत वैयक्तिक खाते उघडायचे असल्यास तुम्ही किमान 1000 रुपये ते अधिकाधिक साडेचार लाख रुपये गुंतवू शकतात. तर संयुक्त खात्यात अधिकाधिक नऊ लाख रुपये जमा करु शकतात.

याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या योजनेमुळे तुम्हाला 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानुसार परताव्याची मोजणी केली जाणार आहे.

जर तुम्ही या योजनेमध्ये संयुक्त खाते उघडलं तर तुम्हाला या योजनेचा दुप्पट लाभ घेता येईल. तो कसा पहा, एखाद्या पती- पत्नीने या योजनेमध्ये संयुक्त खाते उघडून त्यात 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली. 6.6 टक्के व्याजदराने 9 लाख रुपयाच्या जमा रकमेवर 59400 रुपयांचा रिटर्न त्यांना मिळू शकतो. याचाच अर्थ त्यांना दरमहा 4950 रुपये मिळतील. याशिवाय या योजनेत तुमची मूळ रक्कम सुद्ध सुरक्षित राहील. तुम्हाला हवे असल्यास 5 वर्षांनंतर आणखी 5 वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी वाढवता येतोय.

मासिक उत्पन्न योजना योजनेतील चांगली बाब म्हणजे या योजनेमध्ये दोन किंवा तीन लोक एकत्रपणे संयुक्त अकाउंट उघडू शकतात. त्यांच्या या संयुक्त अकाउंटच्या बदल्यात अकाउंटमधील प्रत्येक सदस्यास समान उत्तपन्न दिले जाते. याशिवाय तुम्हाला नंतर कधी ते संयुक्त अकाउंट नको असल्यास त्या संयुक्त अकाउंटचे वैयक्तिक खात्यामध्ये रुपांतर केले जाऊ शकते. तसेच वैयक्तिक खातेसुद्धा संयुक्त खात्यामध्ये रुपांतरीत केले जाऊ शकते. खात्यात बदल करायचा असल्यास सर्व सदस्यांच्या संयुक्त अर्ज द्यावा लागतो. तसेच वाचक आणि इतरांनी या योजनेची सविस्तर माहिती टपाल कार्यालयात जाऊन घेतली पाहिजे.