दिलासा ! कडक निर्बंधाबाबत पुणे महापालिकेचे सुधारित आदेश; सर्व प्रकारची खाजगी वाहने-बसेस सोमवार ते शुक्रवार ‘या’ वेळेत सुरू राहणार, ‘या’ सेवा देखील सुरू राहणार, जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारनं संपुर्ण राज्यात कडक निर्बंध घातले आहेत. जवळपास सर्वत्रच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यानुसारच पुणे महापालिकेने अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून पुण्यातील इतर सर्व दुकाने आणि अस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (दि. 5) घेतला होता. त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. आणखी काही सेवांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता आगामी काळात त्या सेवा पुणे महापालिकेच्या हद्दीत सुरू राहणार आहेत. मात्र, त्याच्या वेळा देखील पुणे मनपाकडून देण्यात आल्या आहेत.

* पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
* सर्व प्रकारच्या कार्गो / कुरियर सेवा
* डेटा सेंटर / क्लाऊड सर्विस प्रोव्हायडर / माहिती व तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सेवा
* शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा
* फळ विक्रेते
* मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने
* पुश वैद्यकीय दवाखाने, पाळणी प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने

* खालील खासगी कार्यालये आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील.

* सेबी तसेच सेबीची कार्यालय (स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटर्स अ‍ॅन्ड क्लेअरिंग को-ऑपरेशन अ‍ॅन्ड इंटरमिडीयट्रीज रजिस्टरर्ड विथ सेबी) या सारख्या बाजाराच्या पायाभूत सुविधा पुरविणार्‍या संस्था.
* आरबीआयच्या नियंत्रणाखालील संस्था
* सर्व नॉन-बँकिंग वित्तीय महामंडळे
* सर्व मायक्रो फायनान्स संस्था
* कस्टम हाऊस एजंट्स, लस /औषधे / जीवन रक्षक औषधांशी संबंधित वाहतूक करणारी अधिकृत परवाना धारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर

सदरील आस्थापनावरील कर्मचारी यांनी भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लसीकरण करून घ्यावे. उल्लंघन करणार्‍यांना 1000 रूपये दंड. सदर नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात येईल.

* पुणे मनपा क्षेत्रात रेल्वे, बसेस, विमान सेवा यामधून येणारे अथवा जाणारे प्रवासी यांनी सोबत अधिकृत तिकीट बाळगले असल्यास त्यांना घरापासून स्थानकापर्यंत / स्थानकापासून घरापर्यंत जाण्यास आठवडयाच्या सर्व दिवस परवानगी राहील.

* पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची खासगी वाहने, खाजगी बसेस सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत सुरू राहतील. तसेच शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्णतः बंद राहतील.

* पुणे मनपा क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांचे साईट ऑफिस / आर्किटेक्चर ऑफिस सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहतील.

* इतर माहिती ट्विटमध्ये जरूर वाचावी