पुण्यातील व्यावसायिकांना मोठा दिलासा ! ‘सम-विषम’चे असलेले बंधन उठविण्यात येणार, काही तासात आदेश होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी महापालिका कार्यालयातून येत आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही दुकाने उघडण्यासाठी सम-विषम तारखेचे असेलेले बंधन उठविण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्याबाबतच आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे आज रात्रीपर्यंत काढणार असल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सुत्रांनी पोलीसनामा ऑनलाइनला दिली आहे. सम-विषमचं बंधन उठणार असल्याने व्यापार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरूवातीला तर केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊन जाहीर केला होता. लॉकडाऊन संपल्यानंतर अनलॉक 1 आणि 2 मध्ये शासनानं लॉकडाऊनचे नियम शिथिल केले. व्यापार्‍यांना सम-विषम तारखेनुसार दुकाने उघडण्याची परवानगी दिली. 1 ऑगस्ट पासून मिशन बिगीन अगेन सुरू झालं असून आता शासन व्यावसायिकांचा विचार करून त्यांना आणखी काही सूट देत आहे. दरम्यान, पुणे शहरात चालु असलेला सम-विषमचा फॉर्म्युला आता बंद करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याबाबत आज रात्रीपर्यंत रितसर आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like