लय भारी ! पासवर्ड शिवाय QR कोडव्दारे ‘या’ पध्दतीनं शेअर करा Wi-Fi, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज काल जगात इंटरनेटची सर्वांनाच गरज असते. इंटरनेट वापरण्यासाठी एक दुसरा पर्याय हा Wi-Fi आला. यानंतर लोकांना अधिक सोपं होऊ झाले. आता ज्यावेळी आपण दुसऱ्या कोणाकडूनतरी Wi-Fi च्या माध्यमातून इंटरनेट सेवा घेत असतो त्यावेळी. आपण त्याचा Password घेत असतो. अनेक वेळा Password चुकीचा पडतो अथवा कधी जोडत नाही. मात्र तुमचा Password दुसरा कोणालातरी शेअर करायचा असेल तर अथवा Password मोठा ,कळत नसल्यास तो शेअर कसा करायचा यामधील अगदी सरळ मार्ग म्हणजे QR कोडच्या माध्यमातून अधिक सोप्या पद्धतीने कोणासह सुद्धा Password न लागता Wi-Fi शेअर करता येणार आहे.

समजा जर जी व्यक्ती Samsung मोबाईल वापरात आहे. तर त्या व्यक्तीसाठी आणखी ही पद्धत सोपी होणार आहे. QR कोडच्या साहाय्याने व्यक्ती सहज Scan करून आपोआप नेटवर्कशी जोडता येणार आहे. व्यक्ती जर Samsung Galaxy स्मार्टफोनमध्ये Android ९ अथवा त्याच्या पुढील Version वापरत असेल तर ती व्यक्ती काही सेकंदात INTERNET शेअर करू शकणार आहे.

कसे कराल QR कोडद्वारे Wi-Fi बरोबर कनेक्ट?
> प्रथम व्यक्तीच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जाने.
> यामध्ये व्यक्तीला कनेक्शन पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर Wi-Fi वर जा.
> Wi-Fi ला WPA, WPA-PSK आणि WEP च्या माध्यमातून सुरक्षित करणे आवश्यक आहे.
> ज्यांबरोबर इंटरनेट शेअर करायचे या त्या डिव्हाइसशी Wi-Fi नेटवर्कद्वारे कनेक्ट करणे.
> यानंतर कनेक्टेड नेटवर्कच्या डाव्या बाजूला दिलेल्या गियर आयकॉनवर टॅप करणे.
> व्यक्तीला स्क्रीनच्या खाली एक QR कोड टायटल असणारे चिन्ह दिसेल. यावर टॅप केल्यानंतर Screenआपोआप ब्राइट होईल.
> व्यक्तीला QR कोड दिसेल, जे स्कॅन करून दुसरी व्यक्ती सहज इंटरनेट अॅक्सेस करू शकणार आहे.