हैदराबाद महापालिका निवडणूक निकाल : मतमोजणीत भाजप आघाडीवर, AIMIM ला धक्का

हैदराबाद : वृत्तसंस्था – खासदार ओवेसीचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या हैदराबादमध्ये भाजपने जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. ग्रेटर हैदराबाद निगम निवडणुकीच्या 150 जागांवर सध्या मतमोजणी सुरू आहे.

मतमोजणीतील आकडेवारीनुसार, भाजपने मुसंडी मारली असून, भाजप 87 जागांवर पुढे आहे, तर सत्ताधारी टीआरएस 38 जागांवर पुढे आहे. हैदराबादमध्ये दुस-या क्रमांकावर असणा-या ओवेसी यांचा पक्ष सध्या 17 जागांवरील आघाडीसह तिस-या क्रमांकावर आहे. भाजपने या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावत जोर लावला होता. त्याचा फायदा भाजपला होताना दिसत आहे. 2016 मधील निवडणुकीत भाजपच्या युतीला फक्त 5 जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत सर्वच पक्षांनी जोरदार ताकद लावली होती. मात्र, भाजपने ही निवडणूक अगदी मोठी निवडणूक असल्याप्रमाणे तगडे खेळाडू मैदानात उतरवले होते. यात गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदीसह मोठे नेते प्रचारसभेत उतरले होते. मात्र, या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे दुपारनंतर स्पष्ट होईल.

You might also like