महिला पोलिस कर्मचाऱ्याचा ‘गँगस्टर’शी शाही ‘विवाह’, महानिरीक्षकांकडून चौकशीचे आदेश

नोएडा : वृत्तसंस्था – आपण दररोज बर्‍याच प्रकारच्या प्रेमकथा वाचत असतो, मात्र अशा काही प्रेमकथा असतात त्या लोकांच्या मनात बरेच दिवस घर करून राहतात. अशीच एक लव्ह स्टोरी उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये समोर आली आहे, ज्यात एक पोलिस कर्मचारी आणि हिस्ट्रीशीटर दोघेही प्रेमात पडतात, आणि दोघे लगीनगाठ बांधतात. परंतु आता पोलीस महानिरीक्षकांनी यामध्ये हस्तक्षेप करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘मनी हाइस्ट’ या गाजत असलेल्या वेबसिरीजमधल्या कथेसारखी ही कथा आहे.

हिस्ट्रीशीटर राहुल थसराणासोबत महिला कॉन्स्टेबल पायलच्या लग्नाच्या प्रकरणानंतर पोलीस महानिरीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशीत महिला पोलीस कॉन्स्टेबल जनपथ मध्ये तैनात नसल्याचे समोर आले आहे. महिला कॉन्स्टेबल इतर कोणत्या जिल्ह्यामध्ये काम करते का याचा तपास पोलीस करीत आहेत. व्हायरल झालेला लग्नाचा फोटो जुना असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉनस्टेबल पायल सूरजपूर कोर्टात लॉकअपजवळ तैनात असताना गँगस्टर राहुलसोबत ओळख झाली. ज्यावेळी गँगस्टर राहुल याला न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी त्यांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात कधी झाले याची माहिती मिळू शकली नाही. यानंतर दोघे बरेच दिवस एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान, राहुल तुरुंगातून सतत बाहेर येत होता. गुरुवारी महिला कॉन्स्टेबलने गँगस्टर सोबत लग्न केल्याचे समोर आले.

हे प्रकरण उघडकीस येताच मेरठ परिमंडळाच्या पोलीस महानिक्षकांनी चौकशीचे आदेश दिले. यानंतर इतर पोलिस ठाण्यातील महिला पोलिसांच्या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिस रात्री उशीरापर्य़ंत या महिला कॉन्स्टेबलची माहिती गोळा करत होते. मात्र पोलिसांना कोणतीही माहिती मिळू शकली नाही. एका गँगस्टर सोबत मुलीने लग्न केल्याने तिच्या घरचे तणावात असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

राहूल ठसराना हा अनिल दुजाना टोळीचा सदस्य आहे. तो २००८ मध्ये गुन्हेगारीच्या दुनियेत आला. राहूल याने मनमोहन गोयल या व्यापाऱ्याचा खून केल्याप्रकऱणी ९ मे २०१४ रोजी अटक झाली होती. मे २०१६ मध्ये पुन्हा गावकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी तो पोलिसांच्या रडारवर आला होता. त्यावेळी त्याची आई ग्राम पंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूकीत उभी होती. त्याने गावकऱ्यांना कुणी तिच्या विरोधात उभे राहिल्यास त्याला परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. त्यावेळी पायल तीन चार दिवसांपुर्वी तेथे जात येत होती. परंतु लोकसभा निवडणूकीनंतर पुन्हा राहूल तेथे आला नाही.

याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत. चौकशीनंतर महिला पोलिसाने हिस्ट्रीशीटरसोबत लग्न केल्याचा दावा केला जात आहे. ती महिला जिल्ह्यात सध्या तैनात नाही. ती कुठली राहणारी आहे. आणि कुठे नोकरीला होती. याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक रणविजय सिंह यांनी दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like