Lockdown : AAP MLA राघव चड्ढांवर योगी सरकारबद्दल अफवा पसरविल्याचा आरोप, नोएडा पोलिसांनी दाखल केली FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   दिल्लीच्या राजेंद्र नगर येथील आम आदमी पार्टीचे (आप) आमदार राघव चड्ढा यांच्यावर अफवा पसरविल्याबद्दल नोएडाच्या सेक्टर -20 पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी आमदार राघव चड्ढा यांनी एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, योगी सरकारच्या निर्देशानुसार पोलिस दिल्लीहून यूपीला जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करत आहेत. यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यूपी पोलिसांनी राघव चड्ढाविरोधात एफआयआर नोंदविला आहे. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल राघव चड्ढा यांनी केलेले ट्विट नंतर हटविण्यात आले. पण, आता ते या प्रकरणात अडकताना दिसत आहेत. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत पटेल यांनी नोएडामध्ये राघव चड्ढाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये राघव चड्ढा यांच्यावर अविश्वास पसरवण्यासह अनेक गंभीर आरोप लावले गेले आहेत.

 

हे केले ट्विट

दिल्ली आणि नोएडा सीमेवरील मोठ्या संख्येने लोकांच्या जमा होण्यावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार राघव चड्ढा यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, ‘योगी जी दिल्लीहून यूपीला जाणाऱ्या लोकांना पळवून पळवून मारहाण करत आहेत. योगी जी सांगत आहेत – आपण दिल्लीला का गेला? आता तुम्हाला लोकांना दिल्लीला कधीच जाऊ दिले जाणार नाही.

राघव चड्ढा यांच्या या ट्विटवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी आपच्या आमदाराला उत्तर देताना ट्विट केले. त्यांनी लिहिले, ‘दिल्लीहून होणारे पलायन हे तुमच्या सरकारचीच देणं आहे. त्यांना ना आसरा मिळाला, ना अन्न ना पाणी, मुसळधार पावसात आपले डोके लपविण्यासाठी त्यांना छतही मिळाले नाही, योगी सरकारने रात्रीतून बस लावून त्याच्या राहण्याची आणि खाण्याची सोया केली आहे. खोटे बोलू नका.