चक्क IPS आधिकऱ्याच्या घरातच थाटला ड्रग्सचा अड्डा

२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय टोळी होती कार्यरत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथील एका IPS आधिकऱ्याच्या घरात चक्क दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट चालू होते. काही दिवसांपूर्वी याचा भांडाफोड झाला. या आयपीएस आधिकऱ्याने हे घर भाड्याने दिले होते. ग्रेटर नोएडा येथील हे घर म्हणजे अवैध व्यापाराचा अड्डाच बनले होते. याचा खुलासा जवळपास ९ मे रोजी झाला जेव्हा दिल्लीतील इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय विमानतळावर तैनात सीआईएसएफ च्या जवानाने आफ्रिकेच्या एका महिलेकडून २४. ७ किलो स्यूड्योफ्रेडीन नावाचे ड्रग हस्तगत केले. या २४ वर्षीय महिलेचे नाव नोमसा असे आहे.

‘त्या’ प्रकरणाशी या घराचा संबंध

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)च्या एका आधिकऱ्याने सोमवारी सांगितले की, स्यूड्योफ्रेडीन चा उपयोग मेथाम्फेटामाइन बनवण्यासाठी केला जातो. ज्याचा यूरोप आणि दक्षिण-पूर्व एशिया मध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा गट नायजेरियन माणूस, किंग्स्ली चालवत होता, जो गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातून गेला होता आणि सरकारी एजन्सींविरुद्ध त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले होते. .

IPS आधिकऱ्याच्या घराचा वापर ड्रग तस्करीसाठी

एनसीबीच्या आधिकऱ्यांनी असे देखील सांगितले की, ” ग्रेटर नोएडातील हे घर IPS आधिकऱ्याने एजंटच्या मदतीने भाड्याने दिले होते. या अधिकाऱ्याला माहित नव्हते की त्यांनी ज्यांना घर दिले आहे ते अमली पदार्थांची तस्करी करतात आणि त्या करणासाठीच त्यांचे घर वापरण्यात येत आहे. IPS आधिकऱ्याच्या घरात राहणारी ही टोळी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या भागात ड्रगस ची तस्करी करीत होती. एव्हढेच नाही तर ही टोळी दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राम मध्ये देखील ड्रग सप्लाय करीत होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की छेडछाड दरम्यान एनसीबी संघाने १,८१८ किलोग्रॅम स्यूडोयॉरायडिन, दोन किलोग्रॅम कोकेन आणि १३४ किलो बनावट हेरोइन हस्तगत केले होते.