‘बर्फाच्छादित’ क्षेत्रात 150 जागांसाठी नोकर भरती, 1.8 कोटीपर्यंतच वार्षिक ‘पॅकेज’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : बर्फाच्छादित क्षेत्रात नोकरी, वार्षिक पॅकेज १.८ कोटी, याशिवाय राहणे आणि खाणे फुकट, ही भरती ऑस्ट्रेलिया सरकारने जारी केली आहे. अंटार्क्टिकामधील ऑस्ट्रेलियाच्या संशोधन स्टेशनला वेगवेगळ्या कामांसाठी १५० पेक्षा जास्त लोकांची आवश्यकता आहे. यामध्ये डॉक्टर, आयटी अधिकारी, प्लॅस्टर, इलेक्ट्रीशियन, सुतार आणि सर्व नोकऱ्यांचा समावेश आहे. टॉप शेफ या संशोधन केंद्रात काम करणाऱ्या लोकांसाठी जेवण बनविणार आहेत. कामासोबतच येथे राहणार्‍या लोकांना नवीन कौशल्ये शिकण्याची संधी देखील मिळणार आहे.

येथे डॉक्टरांचा वार्षिक पगार १.४ कोटी रुपये असेल. त्याचबरोबर आयटी अधिकाऱ्याला वर्षाकाठी ५२ लाख रुपये मिळतील. पगाराव्यतिरिक्त येथे काम करणाऱ्यांना ४३ लाख रुपये विशेष भत्ता म्हणून देण्यात येणार आहे. म्हणजे डॉक्टरांना वर्षाकाठी एकूण १.८ कोटी मिळतील.

उमेदवाराच्या नोकरीबद्दल अधिक माहिती आपल्याला antarctica.gov.au वर मिळू शकेल. ऑस्ट्रेलियाचा अंटार्क्टिका विभाग म्हणणे आहे कि, त्यांना प्रत्येक क्षेत्रातील कुशल कामगारांची आवश्यकता आहे. निवडलेल्या लोकांच्या नोकर्‍या ४ महिन्यांपासून ते १५ महिन्यांपर्यंत असू शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या लोकांना सायकोलॉजिकल टेस्ट आणि वैद्यकीय अनुरुपता चाचणी देखील दिली जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/