‘या’ इलेक्ट्रिक स्कुटीवर मिळणार १८ हजारांची सबसिडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या अन् त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या हे एक दुष्टचक्र आहे. त्यावर इलेक्ट्रिक वाहन हा नवीन उपाय पुढे आला आहे. इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी जवळपास सर्वच कंपन्या सरसावल्या आहेत. विजेवर चालणारी वाहने यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शोधले जात आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्रातील मोठी कंपनी Greaves Cotton ने हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal लाँच केली आहे. विशेष म्हणजे, ही स्कुटी खरेदी केल्यास फेम-२ योजनेअंतर्गत १८ हजार रुपयांचं अनुदान देखील मिळेल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. अनुदानानंतर या स्कुटीची किंमत ६६ हजार रुपये असेल.

इलेक्ट्रिक स्कुटीची वैशिष्ट्ये –
Greaves Cotton ची सहाय्यक कंपनी असलेल्या Ampere Vehicle ने या इलेक्ट्रिक स्कुटीची निर्मिती केली आहे. Ampere Vehicle चे इलेक्ट्रिक व्हेहिकल्स हे तीन वर्षांच्या वॉरंटीसोबत येतात.

या स्कुटीला एकदा पूर्ण चार्ज करण्यासाठी साडे पाच तासांचा वेळ लागतो आणि एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटी ७५ किलोमीटरपर्यंत धावू शकते.

या इलेक्ट्रिक स्कुटीमध्ये ड्युअल स्पीड मोड (इकॉनमी आणि पावर) आणि ॲण्टी थेफ्ट अलार्म आहे. अँटी थेफ्ट अलार्ममुळे ही स्कुटी चोरी होण्याची शक्यता कमीच आहे. पाच रंगांच्या पर्यायामध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like