Green Energy Sector | ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये Tata आणि Adani यांच्यावर आघाडी घेण्यासाठी मुकेश अंबानी यांनी खर्च केले 5800 कोटी; जाणून घ्या डिटेल्स

वी दिल्ली : वृत्तसंस्था – Green Energy Sector | ग्रीन एनर्जी सेक्टर (Green Energy Sector) मध्ये दिग्गज उद्योगपतींमधील स्पर्धा लक्षवेधक होत चालली आहे. टाटा समूह (Tata Group) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणांनंतर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी चाल खेळली आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ने ग्रीन एनर्जी सेक्टरची एक मोठी कंपनी सुमारे 5,800 कोटी रुपयांत खरेदी केली आहे.

 

Green Energy Sector मध्ये 75 हजार कोटी गुंतवणूक
रिलायन्स इंडस्ट्रीजने 10 ऑक्टोबरला एका वक्तव्यात म्हटले होते की, त्यांची 100 टक्के मालकी असलेली रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) ने नॉर्वेची आरईसी सोलर होल्डिंग्ज (REC Group) 771 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 5,800 कोटी रुपयात खरेदी केली आहे. यापूर्वी जूनमध्ये मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या एजीएममध्ये ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

 

ग्रीन एनर्जीवर 5,500 कोटी खर्च करणार Tata Power
ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये टाटा समुह 5,500 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. समूहाच्या टाटा पावर (Tata Power) ने मलेशियाची कंपनी पेट्रोनाससोबत दोन अरब डॉलरच्या गुंतवणुकीवर चर्चेतून माघार घेतल्यानंतर ग्रीन एनर्जी सेक्टरवर (Green Energy Sector) लक्ष केंद्रीत केले आहे. टाटा पावरची योजना 2030 पर्यंत ग्रीन एनर्जीने 80 टक्के वीज बनवण्याची  आहे. कंपनी सध्या 13 गीगावॉट वीज बनवत आहे.

Gautam Adani करणार 1.46 लाख कोटींची गुंतवणूक
वेगाने उद्योगाचा विस्तर करणारे गौतम आदानी यांची आदानी पावर (Adani Power) पुढील चार वर्षात ग्रीन एनर्जी क्षमता तीनपट करणार आहे.
सध्या अदानी पावरची क्षमता 15 गीगावॉट आहे. यासाठी गौतम आदानी यांनी 1.46 लाख कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
ही रक्कम रिलायन्सच्या घोषित गुंतवणुकीच्या सुमारे दुप्पट आहे.

 

Web Title :- mukesh ambani announces acquisition of rec group by reliance industries to take on tata group gautam adani and ntpc in green energy sector

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Band |  ‘बेस्ट’ आणि ‘एसटी’ महामंडळाच्या बसचा बंदमध्ये सहभाग, वाहतुकीवर होणार थेट परिणाम

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,823 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Shashi Tharoor | ‘संसदेत महात्मा गांधींच्या बाजूला सावरकरांचा फोटो कशासाठी?’ शशी थरूर यांचा सवाल