Green Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा धोका, जाणून घ्या याची 4 लक्षणे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Green Fungus |  कोरोना व्हायरस (Corona Virus) च्या दुसर्‍या लाटेने देशात अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. या दरम्यान ब्लॅक फंगस (Black Fungus), व्हाईट (White Fungus) आणि यलो फंगस (Yellow Fungus) सारख्या अनेक फंगल इंफेक्शन (Fungal Infection) च्या केस समोर आल्या आहेत. लोक या फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) मधून अद्याप सावरलेले नसतानाच आता देशात पहिल्यांदा ग्रीन फंगस (Green Fungus) चा प्रकार समोर आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

रिपोर्टनुसार, मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या इंदौर (Indore) मध्ये एका 34 वर्षिय कोविड- 19 मधून रिकव्हर झालेल्या रूग्णात ग्रीन फंगस इन्फेक्शन समोर आले आहे. एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, ग्रीन फंगस इन्फेक्शनचे निदान होताच त्यास ताबडतोब उपचारासाठी एयर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईत शिफ्ट करण्यात आले.

श्री अरबिंदो इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SAIMS) च्या चेस्ट रोग विभागाचे प्रमुख डॉ. रवि दोसी यांच्यानुसार, कोविड-19 (Covid 19)  मधून बरे झालेल्या व्यक्तीची ब्लॅक फंगस (म्यूकोर्मिकोसिस) च्या संशयाने चाचणी केली होती. या चाचणीनंतर रूग्णात ब्लॅक फंगसऐवजी त्याच्या सायनस, फुफ्फुसात आणि रक्तात ग्रीन फंगस (एस्परगिलोसिस) चा संसर्ग आढळून आला. या रूग्णाने कोरोनावर दोन महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला होता. तो खुप कमजोर झाला होता.

ग्रीन फंगसची लक्षणे
1 नाकातून रक्त वाहणे
2 जास्त ताप
3 खुप जास्त वजन कमी होणे
4 कमजोरी जाणवणे

आता मध्य प्रदेशनंतर पंजाबमध्ये सुद्धा ग्रीन फंगसचे प्रकरण समोर आले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel :  green fungus symptoms covid 19 recover patients more prone to green fungus tlif