विमानतळावर आढळले सर्वात महागडया ‘ग्रीन ट्री’ अजगरासह 16 दुर्मिळ साप, किंमत ऐकून व्हाल थक्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कस्टम विभागने मोठी कारवाई करत विमानतळावरून ग्रीन ट्री प्रकारच्या अजगरासहित तब्बल 16 दुर्मिळ सापांना पकडण्यात यश मिळवले आहे. या सापांना दोन व्यक्ती विमानतळावरून घेऊन चालले होते. विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांना त्यांचा संशय आला, पोलिसांनी या व्यक्तींची तपासणी केली असताना त्यांच्याकडून तब्बल 16 वेगवेगळ्या प्रजातींचे साप मिळाले आहेत. या मध्ये हिरव्या रंगाचे ग्रीन ट्री अजगर सुद्धा होते. ज्याला जगामध्ये सर्वात महागडा साप म्हणून ओळखले जाते.

हिरव्या अजगरासहित पकडले 16 आणखी साप आणि पाल
चेन्नईच्या विमानतळावर दोघांना तपासणीसाठी थांबवले असता त्यांच्याकडून ग्रीन ट्री अजगरासहित 16 वेगवेगळ्या प्रकारचे साप जप्त करण्यात आले आहेत. ज्याममधील सर्व सापांच्या किमतीचा अंदाज लावणे थोडे अवघड आहे कारण ग्रीन ट्री नामक अजगराची किंमतच करोडोमधे आहे.

कस्टम विभागाने दोघांना घेतले ताब्यात, सापांच्या या प्रजाती आढळल्या
कस्टम टीमला संशय आल्यामुळे त्यांनी दोघांना तपासणीसाठी बाजूला घेतले असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रजातींचे साप जप्त करण्यात आले आहे.

1 हिरव्या रंगाचा ग्रीन ट्री अजगर, 1 स्क्रब अजगर, 2 ब्लॅक ट्री मॉनिटर पाली, 5 एमराल्ड ट्री मॉनिटर पाली, 2 ब्लू स्पॉट ट्री मॉनिटर पाली, 1 रिसिंगर ट्री मॉनिटर पाल आणि 4 सेलफिन पाली अशाप्रकारच्या वेगवेगळ्या प्रजातींचे साप, अजगर आणि पाली ताब्यात घेण्यात आल्या आहेत आणि पुढील तपास सुरु केला आहे.

ग्रीन ट्री अजगर जगातील सर्वात महागडा साप
मिळालेल्या सर्वच साप अतिशय दुर्मिळ प्रकारचे आहेत. यात मिळालेल्या ग्रीन ट्री अजगराची किंमतच करोडो रुपये आहे. त्यामुळे सापांच्या प्रजातीतीलं हे अजगर सर्वात महागडा साप समजला जातो. हा साप अनेक रंगांमध्ये असतो मात्र हिरव्या आणि निळ्या रंगाची डिमांड यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणूनच ग्रीन ट्री खूप दुर्मिळ आहे.

visit : Policenama.com