नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मिर मध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. आज पुन्हा दहशतवाद्याकडून पुलवामात पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्लात ५ नागरिक जखमी झाले असून, यात दोन नागरिक गंभीर परिस्थिती मृत्यूशी झुंज देत आहे.
J&K: Terrorists lobbed a grenade at Pulwama police station which exploded outside the station, today. Some civilians have received injuries. The area has been cordoned off. pic.twitter.com/ruBy9HCOYv
— ANI (@ANI) June 18, 2019
दहशतवाद्यांना आता थेट पोलीस ठाण्याला लक्ष केले आहे. दहशतवाद्यांनी पुलवामातील पोलीस ठाण्यावर ग्रेनेड फेकला, हा ग्रेनेड पोलीस ठाण्याच्या बाहेर पडून फुटला. यात नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला झालेल्या ठिकाणाला पोलिसांकडून घेराव घालण्यात आला आहे.
आजच पहाटे अनंतनाग येथील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. एक जवान शहीद झाला. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा हल्ल्याच्या शेवटचा सूत्रधार सज्जाद मकबूल भटला सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले. त्याने पुलवामा हल्ल्यासाठी आपली गाडी दिली होती. त्याचा साथीदार तौसिफ हा दहशतवादी देखील यात ठार झाला आहे.
सोमवारी देखील पुलवामामध्ये सैन्यावर हल्ला करण्यात आला. ४४ राष्ट्रीय राइफल्सच्या गाडीला यावेळी आयईडीने उडवण्यात आले. या गाडीने अरिहाल येथे जवान पेट्रोलिंग करत होते. ही गाडी बुलेटप्रुफ होती. तरी सेनेचे ९ जवान यात जखमी झाले. तर २ जवान मंगळवार सकाळी उपचारादरम्यान शहीद झाले.