‘नोबेल’च्या शर्यतीत ग्रेटा, नवेलनी आणि WHO ही; पण ट्रम्पच का झाले नामांकित?

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – यंदाच्या वर्षासाठी नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2021) ची नामांकन प्रक्रिया 31 जानेवारीला संपली. या नामांकनावर विचार केल्यानंतर अंतिम नावासह ऑक्टोबरमध्ये पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. या नोबेल पुरस्कारासाठी ग्रेटा, नवेलनी, WHO यांच्यासह अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दावेदार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत महाभियोग चालविण्याचा विचार सुरु आहे. पण आता त्यांचे नाव नोबेलसाठी विचाराधीन आहे. ट्रम्प यांच्याशिवाय पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग आणि रुसचे नाराज नेते एलेक्सी नवेलनी यांनादेखील यंदाच्या नोबेल शांती पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मात्र, याशिवाय आणखी बरेचसे नावे आहेत, त्यांची नावे नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.

या शर्यतीत कितीजणांची नावे आहेत, याची माहिती आपण घेऊया…
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि त्याच्या COVAX कार्यक्रमालाही नोबेल शांती पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. दरम्यान, नॉर्वेच्या विधी निर्मातांचा रेकॉर्ड होत आहे आणि यातील विशेष बाब म्हणजे जी काही निवड झाली ते बऱ्याच लोक विजेते बनले आहेत.

ही आहेत प्रमुख नावे…
आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या पर्यावरण आणि हवामान बदलाच्या दिशेत अग्रणी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांचे नाव प्रस्तावित आहे. ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ या अभियानासाठी नामांकित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे रुसमध्ये शांतीपूर्ण लोकशाही अशी ओळख असलेल्या एलेक्सी नवेलनी यांचे नाव प्रस्तावित झाले आहे. या नावांशिवाय, बेलारूसच्या कार्यकर्त्या स्वितलाना सिखानॉस्काया, मारिया कोलेसनिकोवा आणि वेरोनिका सेपकालो यांची नावे पाठविण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प नॉमिनेट ?
डोनाल्ड ट्रम्प यांचे नावही नोबेल शांती पुरस्कारासाठी प्रस्तावित आहे. दक्षिणपंथी प्रोग्रेस पक्षाचे खासदार ख्रिश्चियन टिबरिंग यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. इस्त्रायल आणि युएई या दोन्ही देशांत शांती प्रस्तावित करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे योगदान आहे, त्यामुळेच त्यांचे नाव या यादीत आहे.