भारतात ‘इथं’ नवर्‍या मुलाला चक्क शौचालयात काढावा लागतो फोटो, कारण वाचून व्हाल ‘थक्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात असे एक ठिकाण आहे जेथे नवऱ्या मुलाला लग्नाआधी घरातील शौचालयात उभे राहून फोटो काढावा लागतो. मध्यप्रदेशात काही भागात हा प्रकार घडताना दिसत आहे. कारण, असे न केल्यास मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेअंतर्गंत नवदांपत्याला 51 हजार रुपयांच्या निधीवर पाणी सोडावे लागते. शौचालय उभारणीला चालना मिळवी या उद्देशाने मध्यप्रदेशात हा कार्यक्रम राबवला जात आहे.

नो फोटो, नो लग्न –
जर घरात लग्न सोहळा असेल आणि तुम्हाला शासनाकडून मिळणाऱ्या 51 हजार रुपयांच्या मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घरात शौचालय असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ घेता येत नाही. सरकारी अधिकारी अर्जदाराच्या घरी जाऊन शौचालय खरोखर आहे का याची तपासणी करतात परंतू तसे करण्यापेक्षा अधिकरी नवऱ्या मुलाचा शौचालयात उभा राहिलेला फोटो काढून आणायला लावतात.

भोपाळच्या सामूहिक विवाहात जाणाऱ्या एका तरुणाने सांगितले की, नवरा शौचालयात उभा आहे हा फोटो विवाह दाखल्याला जोडणे कसे वाटेल एकदा विचार करुन पाहा. जो पर्यंत मी शौचालयात उभा राहून फोटो काढत नाही तोपर्यंत काझी नमाज पठण करणार नाही असे मला सांगण्यात आले.

विवाहापूर्वी 30 दिवसात घरात शौचालय –
विवाहापूर्वी 30 दिवसात घरात शौचालय उभारावे अशी योजनेची अट आहे. आता ही अट रद्द करण्यात आल्याचे महापालिका योजना प्रभारी सी बी मिश्रा यांनी सांगितले. मिश्रा याच्या मते असे शौचालयात उभे राहून फोटो काढणे अयोग्य आहे. हा फोटो काही विवाह पत्रिकेतील आमंत्रणाचा भाग नाही. काँग्रेस नेते रफीक कुरेशी म्हणाले की स्वच्छ भारत अभियानात शौचालय महत्वाचा भाग आहे हे मान्य आहे, परंतू ही प्रक्रिया या पेक्षा चांगल्या प्रकारे राबवली जाऊ शकते.

ही योजना खरतर आर्थिकदृष्या मागासवर्गीयांसाठी आहे. 18 डिसेंबरला सत्तेत आल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही योजना काँग्रेसने राबवण्यास सुरुवात केली. या योजनेच्या रक्कमेत देखील यानंतर वाढ करण्यात आली ही वाढ 28 हजारावरुन 51 हजार रुपये करण्यात आली. यानंतर योजनेच्या लाभ घेणाऱ्या अर्जदारांची संख्या देखील वाढली. त्यामुळे शौचालयाची तपासणी करणे शासकीय अधिकाऱ्यांना कठीण झाले. त्यावर उपाय म्हणून नवऱ्या मुलाने शौचालयात उभे राहून फोटो काढण्याची प्रक्रिया पुढे आली.

visit : policenama.com