धक्‍कादायक ! केवळ आधार कार्डमध्ये ‘हा’ फरक असल्याने मुलीचे लग्‍न मोडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा हुंडा न दिल्याने किंवा मागण्या पूर्ण न झाल्याने नवऱ्या मुलाने लग्न मोडल्याची अनेक उदाहरणे आपण पहिली आहेत. मात्र या ठिकाणी लग्न मोडण्याचे कारण ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे. आंध्रप्रदेशमध्ये हि घटना घडली आहे. लग्न सुरु असताना नवऱ्या मुलाने लग्नाला नकार दिला. मुलगी आणि तिच्या आईवडिलांनी आपली जात लपवल्याचा आरोप करत मुलाने लग्न करण्यास नकार दिला. ज्यावेळी त्यांनी आधारकार्ड पहिले तेव्हा त्यांना वेगळी जात दिसल्याने आपली फसवणूक झाल्याचे म्हणत त्यांनी लग्नास नकार दिला.

यानंतर नवऱ्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जात तक्रार नोंदवली. आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील गडेवरिपलेम या गावात हा प्रकार घडला आहे. या गावातील शेतकरी मुन्नंगी वेंकट रेड्डी यांच्या मुलीचे गावातीलच मुलाशी लग्न होणार होते. मात्र सर्व विधी पार पडल्यानंतर लग्नाची नोंदणी करण्यासाठी कागदपत्र मागितली असता. त्यातील आधारकार्डवर मुलीचे आडनाव वेगळे होते. त्यामुळे चिडलेल्या मुलाने लग्नाला नकार दिला.

नवरी मुलगी पोलीस स्टेशनमध्ये

मुलीच्या वडिलांच्या आधारकार्डवर त्यांचे आडनाव ‘रेड्डी’ नव्हते. त्यामुळे यावरून दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये वाद झाले. वाद वाढत असल्याचे पाहून मुलगा लग्न मध्येच सोडून आपल्या नातेवाईकांसह निघून गेला. मुलीच्या नातेवाईकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर त्याने काहीही ऐकले नाही. त्यामुळे थेट पोलीस स्टेशन गाठून न्याय मिळण्याची मागणी केली.

दरम्यान, पोलीस या संदर्भात तपास करत असून, या घटनेविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबीयांनी या लग्नासाठी मोठी तयारी केली होती. मुलगा आणि त्याचे कुटुंबीय सध्या फरार असून इतर नातेवाईकांच्या आम्ही संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’