लग्नाच्या दोनच दिवसांपुर्वी नवर्‍या मुलानं केला वधूच्या मैत्रीणीवर बलात्कार, नराधमानं ‘गर्भनिरोधक’ गोळया घेण्यास सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नानंतर बरोबर दोन दिवस आधी एका व्यक्तीने नवरीच्या मैत्रिणीचा बलात्कार केला. अमेरिकेच्या पोकोनॉसमध्ये एका व्यक्तीने आपल्या होणाऱ्या पत्नीच्या मैत्रिणीचा बलात्कार केला.

न्यायालयानुसार मुलगी त्यावेळी नशेत होती आणि त्याच परिस्थितीत व्यक्तीने तुमच्यावर अत्याचार केला. ही घटना 30 ऑगस्टला रात्री प्री वेडिंगच्या पार्टीत झाली.

पीडित तरुणीचे वय 29 वर्ष आहे. तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, राफ्टिंग ट्रीप दरम्यान ती पूर्णता नशेत होती. जेव्हा शुद्धीत आली तेव्हा तिच्या लक्षात आले की ती एका पुरुषांच्या खोलीत होती आणि तिच्या जवळ तिझ्या मैत्रिणीचा होणारा नवरा होता. तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्या सोबत काय झाले आहे. थोड्या वेळाने नवरी नवऱ्याच्या खोलीमध्ये पोहचली तेव्हा ते पाहून त्या दोघींमध्ये वाद झाले.

स्ट्रडसबर्ग च्या 28 वर्षीय डेनिअल जे कार्नेवर कोणत्याही सहमती शिवाय सेक्युअल इंटरकोर्स केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पेन्सेलवानिया स्टेट पोलिसांना पीडित महिलेला आणि आरोपी कार्नेला मधील टेक्स मेसेज आणि कॉल रेकॉर्डिंगवरुन आरोप निश्चित केले आहेत.

कार्नेला सोमवारी 100,000 डॉलर दंड भरुन जामीन देण्यात आला. तपास यंत्रणेने कार्नेचा 2 सप्टेंबरला मुलाखत घेतली. तेव्हा त्याने सांगितले की तो त्या रात्री नशेत होता आणि त्याला वाटले की ती मुलगी त्याचा फायदा घेत आहे. त्याने दावा केला की मुलीने लॉकर रुमपर्यंत तिचा पाठलाग केला, परंतू नंतर त्याने कबूल केले की त्याने जबरदस्ती मुलीला खोलीत नेले होते.

या घटनेनंतर देखील कार्नेचे लग्न झाले. या प्रकरणचा तपास अजूनही सुरु आहे. तर पीडित तरुणी 2 सप्टेंबर पासून रुग्णालयात उपचार घेत आहे. तिने सांगितले की तिचे लैंगिक शोषण झाले आहे.

पीडित तरुणीने त्या दिवशी जास्त नशा केली होती. ती पॅडल बोर्डवरुन अनेकदा पडत होती. यामुळे तिच्या मित्रांनी सुरक्षा म्हणून तिला एका राफ्टमध्ये पोहचवले. जेव्हा सगळे मित्र डेस्टिनेशनला पोहचले तेव्हा ती स्वत: पायावर देखील उभी राहू शकत नव्हती. तिने सांगितले की तिच्या मैत्रिणीने तिच्या पतीला म्हणजेच कार्नेला तिची मदत करण्यासाठी सांगितले. त्यानंतर तो तिला पाण्यापासून दूर घेऊन गेला, परंतू जेव्हा ती शुद्धीत आली तेव्हा ती एका खोलीत होती आणि तिच्या बाजूला कार्ने होता.

यानंतर त्या खोलीत नवरी मुलगी पोहचली आणि ती तिच्या होणाऱ्या पतीवर ओरडली. दोघांमध्ये मोठा वाद झाला. परंतू त्या दोघांमध्ये झालेल्या घटनेला कार्ने मानण्यात तयार नव्हता. दुसऱ्या दिवशी कार्नेने त्या मुलीची फोन करुन माफी मागितली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले की मुलगी आणि कार्ने एका दिशेने जात होते आणि मुलीची परिस्थिती वाईट होती, खोलीच्या दरवाज्याजवळ पोहचल्यावर कार्नेने मुलीला ओढत खोलीत नेले. 20 मिनिटानंतर कार्नेची होणारी पत्नी खोलीत शिरते आणि त्यानंतर कार्ने खोलीतून बाहेर येतो.

रविवारी लग्नाच्या दिवशी सकाळी कार्नेने मुलीची माफी मागितली. मी पुन्हा एकदा तुमची माफी मागत आहे. मी तुझ्या मैत्रिणी बरोबर लग्न करुन आनंदी आहे. असे सांगण्यात येत आहे की कार्नेने मुलीचा गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा देखील सल्ला दिला. तपासात जेव्हा 2 सप्टेंबरला कार्ने आणि पीडित मुलगी यांच्यातील कॉल रेकॉर्ड करण्यात आला. तेव्हा कार्नेने सत्य कबूल केले आणि अत्याचार केल्याचे कबूल केले.

Visit  :Policenama.com