नाद खुळा ! चक्क ‘स्काय डाईव्ह’ करत नवरदेवाची लग्न मंडपात ‘एन्ट्री’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका भारतीयानं नादखुळ्या पद्धतीनं लग्न मंडपात एन्ट्री घेतली आहे. सध्या या नवरदेवाची खूप चर्चा सुरू आहे. स्काय डाईव्ह करत हा नवरदेव थेट लग्न मंडपात पोचला आहे. मेक्सिकोमधील हा प्रकार आहे जिथे एका नवरदेवानं आपल्या बायकोसाठी आकाशातून मंडपात एन्ट्री केली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आकाश यादव असं नवरदेवाचं नाव आहे. तर गगनप्रीत सिंग असं वधूचं नाव आहे.

लंडनमध्ये राहणाऱ्या फोटोग्राफर जोहैब अलीनं या ग्रँड एन्ट्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर अनेकांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही मुलांनी म्हटलं आहे की, आता मुलींच्या अपेक्षा आणखी वाढतील. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की शेरवानी आणि फेटा बांधून नवरदेव थेट आकाशातून विवाहस्थळी पोहोचला आहे. मेक्सिको येथील लॉस कोबोस शहराजवळील हा व्हिडीओ आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नवरदेवानं आपल्या स्काय डायव्हींगचा अनुभव सांगितला आहे. आकाश म्हणाला, “लग्न मंडपात येताना ग्रँड काहीतरी करायचे माझ्या डोक्यात होते. मी सुरुवातीला कुटुंबासोबत बोटीनं येणार होतो. परंतु काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. म्हणून मी थेट हवेतून येण्याचा विचार केला.”

जेव्हा आकाश स्काय डायव्हींग करत आकाशातून येत होता तेव्हा त्याच्या स्वागतासाठी खाली 500 हून अधिक पाहुणे उभे होते. यासाठी 2 दिवस त्यानं सरावही केला होता. त्याच्या स्काय डायव्हींगआधी वादळाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तरीही आकाशनं आपला निर्णय मागे घेतला नाही.

https://www.instagram.com/p/B2uMiaBF8Pj/

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !