नवरदेवाच्या DJ डान्सचा व्हिडिओ ‘व्हायरल’, आनंदाचा शेवटचा दिवस असल्याचं लोकांनी सांगितलं (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टिकटॉकची क्रेझ सध्या चांगलीच वाढत आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या प्रकारच्या सगळ्या सोशल मीडियावर सध्या टिकटॉकचाच बोलबाला आहे. आता टिकटॉक म्हणजे हास्यास्पद व्हिडीओ असाच अर्थ झाला आहे. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक नवरदेव दिसत आहे. ज्याने डीजेच्या गाण्यावर जोरदार ठेका धरला आहे.

सोशल मीडियावर या व्हिडिओला जोरदार विनोदी कमेंट येत आहेत. या व्हिडीओ मधून नवरदेवाला आपल्या लग्नाचा किती आनंद झाला आहे हे स्पष्ट दिसून येते. अशा प्रकारचे लग्नातील अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आहेत. यामध्ये नवरदेव स्वतः जोशात नाचताना दिसत आहे.

टिकटॉकवर सध्या लग्नातील, दारूड्यांचे, नवरदेवाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. टिकटॉक हे अशा प्रकारच्या कॉमेडी व्हिडीओचे ठिकाणाचं बनत बनत चालले आहे.

Visit : Policenama.com

You might also like