COVID-19 : ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करण्यासाठी आमच्याकडून अगाऊ Tax घेतला, 80 कोटयाधीशांनी सांगितलं

लंडन : पोलीसनामा ऑनलाइन  –   80 पेक्षा जास्त करोडपतींनी सोमवारी जगभरातील सरकारांना विनंती केली की, त्यांनी अत्यंत श्रीमंत लोकांकडून जास्त टॅक्स वसूल करावा, जेणेकरून जागतिक अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीसाठी मोठा फंड जमा करता येईल. या 80 करोडपतींनी आपल्या ग्रुपचे नाव Millionaires for Humanity (मानवतेसाठी करोडपती) ठेवले आहे. त्यांनी या ओपन लेटरमध्ये लिहिले आहे की, या अत्यंत श्रीमंत लोकांकडून जास्त टॅक्स वसूल केला पाहिजे आणि तो स्थायीसुद्धा असावा. कोरोना व्हायरस आऊटब्रेकमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत सातत्याने अनिश्चितता कायम आहे आणि बेरोजगारी दरातसुद्धा वाढ होत आहे.

या ओपन लेटरवर हस्ताक्षर करणार्‍या करोडपतींच्या यादीत बेन अँड जेरीज आयस्क्रीम कंपनीचे सह-संस्थापक जेरी ग्रीनफील्ड, स्क्रीनरायटर, रिचर्ड कर्टिस आणि फिल्ममेकर एबिगेल डिजनी यांची सुद्धा नावे आहेत. याशिवाय, अमेरिकेचे उद्योगपती सिडनी टोपोल आणि न्यूजीलँडचे रिटेलर स्टीफन टिंडल हेदेखील सहभागी आहेत. द गार्डियनने आपल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

ओपेन लेटरमध्ये करोडपतींनी काय लिहिले?

त्यांनी या लेटरमध्ये लिहिले, कोविड-19 ने जगाला पीडित केले आहे, अशावेळी महामारीला तोंड देण्यासाठी आमच्या सारख्या करोडपतींची महत्वाची भूमिका आहे. आम्ही इंटेसिक केयर वॉर्डमध्ये उपचार करत असलेल्या लोकांच्या उपचारासाठी नाही, ना आम्ही कोणत्या अशा अ‍ॅम्ब्युलन्सला ड्राईव्ह करत आहोत जी आजारी लोकांना हॉस्पिटलला पोहचवत आहे, आणि ना आम्ही दरवाजापर्यंत फूड डिलिव्हरीसाठी ग्रोसरी स्टोर्सच्या शेल्व्स स्टॉक करत आहोत.

यामध्ये पुढे लिहिले आहे, परंतु आमच्याकडे पैसा आहे, खुप जास्त. तो पैसा, ज्याची खुप गरज आहे, आणि येणार्‍या संकटातून जगाला वाचवण्यासाठी त्याची आवश्यकता आहे.

अनेक देश टॅक्स वाढवण्यावर करत आहेत विचार

हे पत्र अशावेळी पब्लिश करण्यात आले आहे, जेव्हा जी 20 देशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक होणार आहे. सध्याच्या संकटात बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. यापैकी काही देश तर आता जास्त टॅक्स वसूल करण्यावर सुद्धा विचार करत आहेत.

युनायटेड किंगडममध्ये इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल स्टडीजच्या थिंक-टँकचे म्हणणे आहे की, जास्त टॅक्स आता जास्त लोकांना द्यावा लागू शकतो. यामध्ये केवळ अत्यंत श्रीमंत लोकच सहभागी होतील असे नाही.

या देशांनी वाढवला टॅक्स

याच महिन्यात स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी संकेत दिले होते की, त्यांचे सरकार आता जास्त टॅक्स वसूल करेल. रशियासुद्धा जास्त कमाई करणार्‍यांवर टॅक्स वाढवण्याचा विचार करत आहे. सौदी अरबने सेल्स टॅक्समध्ये अगोदरच वाढ केली आहे. कच्च्या तेलाची मागणी घटल्यानंतर येथील सरकारने हा निर्णय घेतला होता.

मिलियनरीज फॉर ह्यूमॅनिटी लेटरसाठी ऑक्सफॅम, टॅक्स जस्टिस युके आणि अमेरिकेत उच्च नेटवर्थ असणार्‍या लोकांचा एक समूहसुद्धा सहभागी आहे. या समूहाचे नाव पॅट्रीओटीक मिलियनरीज आहे. कोविड-19 संकटात सातत्याने मागणी होत आहे की, या श्रीमंतांनी जास्तीत जास्त योगदान दिले पाहिजे.

कोरोना संकटातसुद्धा वाढत आहे श्रीमंतांची संपत्ती

विशेष म्हणजे कोरोना व्हायरस संकटातसुद्धा अत्यंत श्रीमंतांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीत यावर्षी 75 अरब डॉलरची वाढ होईल. सध्या त्यांच्याकडे सुमारे 189 अरब डॉलरची एकुण संपत्ती आहे. सध्या अल्ट्रा वेल्थीच्या कॅटेगरीत येणार्‍या लोकांची एकुण संख्या 5 लाखपेक्षा सुद्धा जास्त आहे, जी आईसलँड, माल्टा किंवा बेलीजच्या लोकसंख्येपेक्षा सुद्धा जास्त आहे.