‘या’ कारणामुळं ‘BSNL – MTNL’च्या 85 हजार कर्मचाऱ्यांना मोदी सरकार ‘VRS’ देणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तोट्यात चाललेली सरकारी टेलीकॉम कंपनी ‘भारत संचार निगम लिमिटेड’ ( BSNL) आणि महानगर टेलीकॉम निगम लिमिटेड (MTNL) या कंपन्यांसाठी सरकारने महत्वपूर्ण प्लॅनची तयारी केली आहे. या दोनीही कंपन्यांच्या कामगारांची संख्या अर्धी केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ग्रुप ऑफ मिनिस्टर्स (GoM) च्या मध्ये सहमती झाली आहे आणि GoM ने याबाबत हिरवा कंदील दाखवला आहे.

५० वर्षांपेक्षा मोठ्या कामगारांसाठी VRS स्कीम

सरकार MTNL आणि BSNL मधील ५० वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना VRS स्कीम देणार आहे. यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये ८५ हजार कर्मचारीच राहणार आहेत. सध्या दोन्ही कंपन्यांमध्ये १.८० लाख इतके कर्मचारी आहेत. VRS साठी सरकार जवळजवळ ४० हजार कोटी इतका खर्च करणार आहे. पुढच्या ८ वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे.

कंपन्यांच्या रिव्हायव्हलसाठी सरकार BSNL आणि MTNL च्या कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट वय कमी करून ५८ वर्षे करणार आहे. स्पेशल केसमध्ये कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे वय कमी होणार आहे.