…आता जुनं सोनं आणि ज्वेलरी विकल्यानंतर द्यावा लागेल GST ? जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सोन्याच्या किंमतीत घसरण आल्यानंतर जर तुम्ही ज्वेलरी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वपूर्ण आहे. न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, लवकरच जुने सोने आणि ज्वेलरी विकल्यानंतर जीएसटी लागू शकतो. केरळचे अर्थ मंत्री थॉमस इसाक यांनी सांगितले की, राज्याच्या अर्थ मंत्र्यांच्या समुहात (जीओएम) जुने सोने आणि दागिन्यांच्या विक्रीवर तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावण्याच्या प्रस्तावावर जवळपास सहमती झाली आहे.

सोने, ज्वेलरीवर किती टॅक्स लागतो?

सोन्याची किंमत बाजारात ज्वेलरीच्या वजन आणि कॅरेटच्या हिशेबापेक्षा वेगळी असते. परंतु, सोन्याची ज्वेलरी खरेदी केल्यानंतर याची किंमत आणि मेकिंग चार्जवर 3 टक्के जीएसटी लागतो. ज्वेलरीचे पेमेंट तुम्ही कोणत्याही मोडमध्ये केले तरी, 3 टक्के जीएसटी भरावा लागेल.

विकल्यावर किती लागतो टॅक्स?

सोने खरण्यासोबत सोने विकताना सुद्धा टॅक्स लागतो. विकताना हे पाहिले जाते की, ज्वेलरी तुमच्याकडे किती काळापासून आहे, कारण त्या कालावाधीच्या हिशेबाने त्यावर टॅक्स लागेल. सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (एसटीसीजी) आणि लाँग टर्म कॅपिटल गेन (एलटीसीजी) टॅक्स चुकवावा लागेल.

सोन्यावर शॉर्ट कॅपिटल गेन टॅक्स तेव्हा लागेल जेव्हा खरेदीच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आत तुम्ही ज्वेलरी विकता. एसीसीजीच्या नियमानुसार टॅक्स चुकवावा लागेल. ज्वेलरी तुमची जेवढी कमाई झाली आहे त्या कमाईवर इन्कम टॅक्स स्लॅबच्या हिशेबाने टॅक्स कापला जाईल.

3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जुनी ज्वेलरी विकताना लाँग टर्म कॅपिटल गेन (एलटीसीजी) च्या हिशेबाने टॅक्स भरावा लागेल. एलटीसीजीनुसार, टॅक्सचा दर 20.80 टक्के असेल. मागच्या बजेटमध्येच एलटीसीजी वर सेस 3 टक्केवरून वाढवून 4 टक्के केला आहे. टॅक्सच्या दरात सेस समाविष्ट आहे. मात्र, त्यापूर्वी पर्यंत सोने विकल्यानंतर 20.60 टक्के एलटीसीजी लागत होता.