‘चीनी आईची मुलगी म्हणून मोठं होणं सोपं नव्हतं, आता लोक मला हाफ ‘कोरोना’ म्हणतायेत’ : बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारत कोरोनाशी लढा देत आहे. या लढाईत भारताचे क्रिडाजगत देखील महत्वपूर्ण कामगिरी निभावत आहे. परंतु या दरम्यान महिला डबल्समधील भारताची दिग्गज बॅडमिंटनपट्टू ज्वाला गुट्टा यांनी आपले दुख वक्त क्ले आहे. तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल व्हावं लागत आहे. एक वृत्तानुसार ज्वाला गुट्टा हिने सांगितले की काही मुद्द्यावर ती सहमत नसल्याने लोक तिला चीनचा माल, हाफ चीनी आणि चिंकी सारख्या कमेंट करत आहेत.

कसे वाटेल की जेव्हा एखादा विदेशी तुम्हाला मलेरिया म्हणेल –
ज्वाला गुट्टा यांनी सांगितले की या ट्रोल होणाऱ्या कमेंटमध्ये हाफ कोरोना शब्द देखील वापरण्यात आला आहे. मला माहित आहे की लोक मला ट्रोल करत आहेत, तसेच व्यक्तिश भेटल्यावर माझ्यासोबत सेल्फी घेण्याची मागणी देखील करत आहे. त्या म्हणाल्या की चीनी आईची मुलगी म्हणून मोठं होणं सोपं नाही. एक भारतीय म्हणून कोणाला कोरोना किंवा चाइनीज व्हायरस म्हणताना आपण विसरत आहोत की आपल्याकडे मोठ्या संख्येने मलेरियाची प्रकरण समोर आली होती आणि ट्यूबरक्लोसिसमुळे दरवर्षी 2 लाख पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. एकदा विचार करा की विदेशात एखादा भारतीय रस्त्यावरून फिरत असेल आणि त्याला तेथील लोक मलेरिया किंवा टीबी म्हणून बोलावत असेल तर त्याला कसे वाटेल.

ज्वाला यांनी सांगितले की माझ्या आईने कधीही नव्या संस्कृतीसोबत मिसळून घेण्याची तक्रार केली नाही. परंतु हे काही सोपे नव्हते. जेव्हा मी मोठी होत होते तेव्हा मी विचार केला की हे फक्त यामुळे आहे की मी थोडी वेगळी दिसते आणि उंच आहे. मी गोरी आहे. मी त्या मुलांना देखील हेच सांगायचा प्रयत्न करते की माझा चेहरा थोडा मोठा आहे म्हणून माझे डोळे छोटे दिसतात. परंतु जेव्हा मी 22 वर्षांची झाले तेव्हा मला लक्षात आले की यातील काहीही स्वीकार्य नाही. मी पाहिले की नॉर्थ ईस्ट मधील व्यक्तींना देखील अशा प्रकारच्या हिंसेचा सामना करावा लागतो.

माझ्या पंजोबांना महात्मा गांधींनी शांतिदूत नाव दिले होते –
ज्वाला यांनी सांगितले की माझे पंजोबा भारतात आले होते आणि त्यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्यासोबत शिक्षण घेतले होते. एवढेच काय तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांना शांतीदूत नाव दिले होते. ते सिंगापूर – चायनीज वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते आणि महात्मा गांधीच्या आत्मचरित्राचा अनुवाद करु इच्छित होते. तेव्हा माझी आई त्यांच्या मदतीसाठी भारतात आली होती.

ओलिंपिक पदांंच्या यादीत वरच्यास्थानी का आहे चीन –
भारताच्या बॅडमिंटन पट्टू ज्वाला यांनी सांगितले की मी 2002 साली ग्वांगझूमध्ये गेले होते. तेथे मी पाहिले की हा देश ऑलिंपिकमध्ये पदकांच्या यादीत वरच्यास्थानी आहे. ते लोक अर्ध्या तासाचा लंच ब्रेक घेतात आणि तेथे रस्त्यावर देखील खेळण्यासाठी टेबल लावलेला असतो. तेथे सुनिश्चित केले जाते की तसे लोक आधिकाधिक शारीरिक गतिविधीत हिस्सा घेतील.
चीनी लोक कष्टाळू आहेत. माझी आई फॉर्मास्युटिकल कंपनीत सल्लागार आहे आणि सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करतात. त्यांना अशा दक्षिण भारतीय कुटूंबासोबत अ‍ॅडजेस्ट करावे लागले, ज्यांनी तिला तिच्या दिसण्यामुळे कधीही स्वीकारले नाही. मात्र माझे आई वडील कायम एकमेकांसोबत उभे राहिले आणि मला त्यावर गर्व आहे.