खुशखबर ! छोटया व्यापार्‍यांना लवकरच मिळणार कागदपत्रांशिवाय 1 कोटीचं कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील छोट्या व्यापाऱ्यांना आता 10 लाखावरुन वाढवून 1 कोटी रुपयांचे कर्ज विना कागदपत्र मिळू शकते. सरकारी बँका ही योजना लवकरच सुरु करु शकतात. जे व्यापारी 6 महिन्यांपर्यंतचा जीएसटी रिटर्न योग्य पद्धतीने फाइल करतात त्यांना कर्ज घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाही. अर्थ मंत्र्यांनी जीएसटी एक्सप्रेस लोनला मंजुरी दिली आहे.

काय आहे योजना –
जीेएसटी रिटर्न फाइल कारणाऱ्यांना मोठी खुशखबर आहे. 59 मिनिटात लोन योजनेनंतर आता बँकेने जीएसटी एक्सप्रेस लोनची योजना आणली आहे. या अंतर्गत कोणत्याही फायनान्शियल सिस्टिम अंतर्गत 10 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज व्यापारी घेऊ शकतात.

कोणाला मिळणार फायदा –
अर्थ मंत्रालयाने जीएसटी रिटर्नवर कर्ज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही योजना सरकारी बँका आणत आहे. या योजनेचा लाभ व्यापारी, प्रोफेशनल, कंपन्या किंवा फर्म तसेच सहकारी संस्था यांना मिळेल.

योजनेसंबंधित अटी –
व्यापाऱ्यांना जीएसटी रिटर्नच्या आधारे ओवरड्राफ्ट सुविधा मिळेल. कर्जाची रक्कम वार्षिक उत्पन्न, विक्री या आधारे निश्चित करण्यात येईल. एफ डी, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र हे देखील तुम्ही कोलॅटरल म्हणून ठेवू शकतात. रेपो बेस्ड लेंडिग रेट (RBLR) नुसार 2.25 टक्क्यापर्यंत व्याजदर असू शकतो. 1 वर्षाची मर्यादा असलेल्यांना कर्ज दरवर्षी रिन्यू करता येईल.

OBC म्हणजेच ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स सह अनेक सरकारी बँका हा प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणारा कार्यक्रम सुरु करतील.

Visit : policenama.com

Loading...
You might also like