खुशखबर ! छोट्या व्यापार्‍यांना ‘कम्पोजिशन स्कीम’मध्ये ६ % GST च्या दराने सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील छोट्या व्यावसायिकांसाठी आज झालेल्या जीएसटी काऊन्सिलमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यापाऱ्यांसाठी असलेल्या कम्पोजिशन स्कीम मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामुळे आता छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल ५० लाखांपर्यंत आहे ते व्यापारी ३० सप्टेंबर पर्यंत या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे आता हा निर्णय व्यापाऱ्यांवर अवलंबून असणार आहे कि, त्यांना या स्कीममध्ये स्वतःचे नाव नोंदवायचे आहे कि नाही.

काय मिळणार फायदा

या स्कीममध्ये नाव नोंदवणाऱ्या व्यापाऱ्यांना ६ टक्के जीएसटीच्या दराने सेवा पुरवावी लागणार आहे. जीएसटी अंतर्गत अनेक सेवांवर जास्तीत जास्त १२ ते १८ टक्के जीएसटी द्यावा लागतो. या स्कीमचा लाभ आतापर्यंत फक्त ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल १ कोटी रुपयांपर्यंत आहे त्यांनाच मिळत होता. मात्र एप्रिल महिन्यात याची मर्यादा दीड कोटी रुपये करण्यात आली होती. आज झालेल्या निर्णयानुसार ५० लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, आजपर्यंत सरकारकडे नोंद असलेल्या कंपन्यांपैकी १ कोटी २२ लाख कंपन्यांनी या स्कीममध्ये नोंदणी केली आहे तर १७ लाख ५० हजार व्यावसायिकांनी नोंद केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like