1 ऑक्टोबरपासून दैनंदिन जीवनातील ‘या’ गोष्टी स्वस्त तर काही गोष्टी महाग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलच्या 37 व्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार वस्तूंच्या जीएसटी दरात बदल करण्यात आले आहेत. यानुसार 1 ऑक्टोबरपासून आता बरीच उत्पादने महाग होतील त्याचबरोबर बर्‍याच दैनंदिन वस्तू स्वस्त होणार आहेत.

या गोष्टी होणार स्वस्त –
1) हॉटेलमध्ये मुक्काम स्वस्त-

जीएसटी कौन्सिलच्या गोवा बैठकीत हॉटेल इंडस्ट्रीला मोठा दिलासा मिळाला आहे. आता 1000 रुपयांपर्यंत भाड्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. त्याचबरोबर टॅरिफ हॉटेलच्या 7500 रुपयांपर्यंतच्या भाड्यावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल.

7500 रुपयांपर्यंतचे दर असलेल्या हॉटेल रूममध्ये 18 टक्के दराने जीएसटी लावला जात होता. त्याचप्रमाणे 7500 रुपयांपेक्षा जास्त भाडे असणाऱ्या टॅरिफ हॉटेलच्या रूमवर जीएसटी 18 टक्के करण्यात आला आहे. तर यापूर्वी हॉटेलच्या खोल्यांवर 28 टक्के दराने कर आकारला जात होता. नवीन जीएसटी दर 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.

2) ही वाहने झाली स्वस्त-
जीएसटी कौन्सिलने 28 % जीएसटी अंतर्गत येणार्‍या 10 ते 13 सीटर पेट्रोल-डिझेल वाहनांवरील सेस (उपकर दर) घटवला आहे.

1200 सीसी पेट्रोल वाहनांवर सेस 1 टक्के आणि 1,500 सीसी डिझेल वाहनांवर सेस 3 टक्के करण्यात आला आहे. दोन्ही प्रकारच्या वाहनांवरील सेसचा सध्याचा दर 15 टक्के आहे. त्याचबरोबर जीएसटीचा दर 28 टक्के आहे.

3) सुकलेली चिंच स्वस्त –
जीएसटी परिषदेच्या बैठकीत सुकलेल्या चिंचेवरील जीएसटी दर कमी केला आहे. पूर्वी जीएसटी 5 टक्के असायचा.

4) पॅंटची स्वस्त झिप –
न झिपवरील (स्लाइड फास्टनर्स) जीएसटी 18 वरून 12 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.

या गोष्टी देखील स्वस्त झाल्या आहेत –
जीएसटी कौन्सिलने रत्ने, इंधन, ग्राइंडर, हिरे, माणिक, पन्ना किंवा नीलम यांच्यावरील जीसएटी व कराचे दर कमी केले आहेत.

याव्यतिरिक्त, भारतात बनवलेल्या काही खास प्रकारच्या संरक्षण उत्पादनांनाही जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.

या गोष्टी झाल्या महाग –
1) रेल्वे कोच –
जीएसटी दर रेल्वेच्या प्रवासी कोच आणि वॅगन्सवर जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

2) कॉफीन असणारी उत्पादने –
कॉफीन असणाऱ्या पेयांवर जीएसटी 18 टक्क्यांऐवजी 28 टक्के आणि 12 टक्के अतिरिक्त सेस लावण्यात आला आहे.

इतर निर्णय-
1)
याशिवाय विणलेल्या / न विणलेल्या पॉलिथिलीन पिशव्यावर 12% एकसमान दराने जीएसटी आकारला जाईल.

2) जीएसटी बैठकीत जीएसटी अंतर्गत कर भरणाऱ्या करदात्यांचे रेजिस्ट्रेशन आधारला जोडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय परताव्याचा दावा करण्यासाठी 12 अंकी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याबाबतही चर्चा झाली.

3) जीएसटी परताव्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली जाईल. कौन्सिलच्या निर्णयानुसार एप्रिल 2020 पासून रिटर्न भरण्याचा एक नवीन मार्ग लागू केला जाईल जेणेकरून लोकांना त्याचा स्वीकार करण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

Visit – policenama.com