व्यापार्‍यांसाठी मोठी बातमी ! आता ‘इथं’ देखील आधार लिंक करणं झालं बंधनकारक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीएसटीमधील होणारी फसवणूक आणि चुकीच्या परवाव्यावर प्रतिबंध करण्यासाठी जीएसटी परिषदेच्या ३७ व्या बैठकीत जीएसटीअंतर्गत कर भरणाऱ्या करदात्यांना आधार लिंक अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परताव्यासाठी (रिटर्न) दावा करण्यासाठी आधार लींक अनिवार्य करण्याची चर्चाही या बैठकीत करण्यात आली. तसेच, ज्यामध्ये डिलरला अतिरिक्त सूट देण्यावर कंपनीने जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. ते परिपत्रक मागे घेण्याचा निर्णयही वेळी घेण्यात आला.

गोवा येथे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक झाली, या बैठकीत रोजगार पुरवणाऱ्या लघु व मध्यम उद्योगांना जीएसटी फाईल करण्यासाठी दिलासा देण्यात आला.

जीएसटी रिटनची सोपी होणार प्रोसेस
जीएसटी रिटर्नची प्रक्रियाही सुलभ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली जाईल. रिटर्न भरण्याची नवीन प्रक्रिया एप्रिल २०२० पासून अंमलात येईल. असे काही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

याशिवाय बैठकीत घेतलेले इतर निर्णय
कॅफिनयुक्त शीतपेयांवरील कराचे दर १८ ते २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता.
विणलेल्या आणि न विणलेल्या पॉलिथिलीन पिशव्यावरील जीएसटी दर कमी करून १२ टक्के.
हिरा उद्योगातील डायमंड कट कराचे दर पाच टक्क्यांवरून १.५ टक्क्यांपर्यंत खाली.
बदामाच्या दुधावर १८ टक्के कर आकारला जातो.
ज्या हॉटेलमध्ये ७५०० आणि त्यापेक्षा अधिक भाड्याने असलेल्या खोल्यांवर आता १८ टक्के कर आकारला जाईल. पूर्वी हा दर २८ टक्के होता. १००१ रुपयांपासून ७५०० पर्यंत भाडे असणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवर कराचा दर १२ टक्के असेल. तर १००० रुपयांपर्यंतच्या भाड्यावर कोणताही जीएसटी देय होणार नाही.
– दहा ते बारा व्यक्तींची क्षमता असलेल्या पेट्रोल मोटार वाहनांवरील सेस एक टक्क्याने कमी करण्यात आले आहे.तर डिझेल वाहनांवरील सेस तीन टक्के असेल.
– स्वदेशी उत्पादित नसलेल्या विशिष्ट संरक्षण वस्तूंच्या आयातीवर जीएसटी / आयजीएसटीकडून सूट देण्यात आली आहे, ती केवळ २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. भारतात होणाऱ्या १७ वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वकपसाठी फिफा आणि इतर महत्वाच्या व्यक्तींना करण्यात येणाऱ्या वस्तू व सेवांचा पुरवठ्यात सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

Visit – policenama.com