खुशखबर ! इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकींच्या किंमतीत मोठी घट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीएसटी काउंसिलच्या आज झालेल्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत महत्वाचे आणि सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या स्कुटर आणि कारच्या किमतींमध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आली आहे. कमी करण्यात आलेले नवीन दर १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. २५ जुलै रोजी हि बैठक होणार होती. मात्र अर्थमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे हि बैठक आज घेण्यात आली.

Image result for electric bike

वाहनांच्या किमतीवर लागणारा १२ टक्के जीएसटी हा ५ टक्क्यांवर खाली आणण्यात आला आहे. त्याचबरोबर या गाड्यांच्या चार्जरवरील जीएसटी देखील १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणण्यात आली आहे. याचबरोबर १२ पेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक बसवर देखील जीएसटी सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांवर फक्त ५ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता सामान्य ग्राहकांना मोठी सूट आणि दिलासा मिळणार आहे. समजा तुम्ही १० लाख रुपयांपर्यंतची इलेक्ट्रिक कार घेतली तर १ ऑगस्टनंतर आता तुमची जीएसटीच्या रूपात जवळपास ७० हजार रुपयांची बचत होणार आहे. त्याचवेळी तुम्ही १ लाख रुपयांची इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केल्यास तुमची ७ हजार रुपयांची बचत होणार आहे.

जीएसटी काउंसिल की बैठक में हुआ बड़ा फैसला, बैटरी से चलने वाली कार और स्कूटर पर कम हुआ टैक्स

दरम्यान, सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी या गाड्यांच्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार आज कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त –