मोबाईल खरेदी महाग झाली, GST Council नं किंमती वाढवण्याचा घेतला निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीएसटी कौन्सिलची शनिवारी बैठक पार पडली. शनिवारी झालेल्या बैठकीत फर्टिलाइजर्स (खतं) आणि फुटवेअरवर लावण्यात येणाऱ्या जीएसटी दरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेक्सटाइल वस्तूंवर जीएसटी दरांवर विचार करण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. असे असले तरी कौन्सिलने मोबाइल फोनवर आकारण्यात येणारा जीएसटी दर 12 टक्क्यांवरुन 18 टक्के केला आहे.

सेस वाढवल्याने महसूल घटण्याची भीती –
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सेस वाढवण्याची शक्यता कमीच आहे. आर्थिक मंदी सुरु आहे. जर सेस वाढवला गेला तर यामुळे शक्यता आहे की महसूलात कमी येईल. तसेच ज्या वस्तूंवर सेस आकारला जातो, त्यावर कर वाढवण्याचा कोणताही विचार नाही.